वनप्लस ही चीनी कंपनी मोबाइलच्या बाजारात एकदम नवखी तरीही त्यांनी अल्पावधीतच प्रचंड यश मिळवलं आहे. भक्कम फीचर्स असलेला फोन आणि किंमत कमी, क्वालिटी चांगली असल्यामुळे केवळ 2 मॉडेल्स सादर केलेल्या या कंपनीच्या मोबाइल्सवर अक्षरशः उड्या पडताना दिसत आहेत.
यापूर्वीचे वनप्लस 1 आणि वनप्लस 2 चांगलेच गाजले आहेत. मात्र या कंपनीचा फोन घेताना आपल्याला Invite सिस्टमनेच घेता येतो. ह्या सिस्टममध्ये आपल्याला प्रथम त्यांच्या वेबसाइटवर जाऊन रजिस्टर करावं लागतं. त्यानंतर आपण हा फोन घेणार्या ग्राहकांच्या वेटिंग लिस्टमध्ये सामील होतो. जर आपला नंबर पुढे सरकत गेला तर आपल्याला वनप्लस हा फोन घेण्यासाठी Invite करतं. हा कोडे घेऊन Amazon वर जाऊन आपण फोन विकत घेऊ शकतो. नुकतीच त्यांनी invite 3 दिवसांतपर्यंत वैध राहील असं जाहीर केलय.(यापूर्वी केवळ 1 दिवस).
तर या वनप्लस कंपनीचा नवा फोन आज सादर झाला. OnePlus X असं या मॉडेलचं नाव असेल. ज्या ग्राहकांना वनप्लस 2 परवडत नाही त्यांना चांगला पर्याय उपलब्ध झालाय. वनप्लस वन आणि टू यांची किंमत 20000 वर होती.
OnePlus X फीचर्स :
- डिस्प्ले : 5″ फूलएचडी AMOLED Gorilla Glass Body with Metal Sideline
- प्रोसेसर : Snapdragon 801
- रॅम : 3GB, स्टोरेज : 16GB + 128GB पर्यन्त वाढवता येणारं SDकार्ड स्लॉट
- सिम स्लॉट : डबल सिम 4G
- बॅटरी : 2525mAh
- कॅमेरा : 13MP + 8MP (F2.2)
- OS : ऑक्सिजन ओएस (अँड्रॉइड 5.1.1)
- किंमत : $249 (Rs.16999)
वनप्लस 2 असलेल्या मात्र या फोनमध्ये नसलेल्या गोष्टी : फिंगरप्रिंट सेन्सर, 4K रेकॉर्डिंग, यूएसबी टाइप C
ह्या फोनसाठी काही पर्याय खाली देत आहोत. ह्यांची किंमत एकाच प्रकारात मोडते….
Asus Zenfone 2, Xiaomi Mi4, Moto X Play, Moto G3, Xperia M4,HTC Desire 820, Samsung J7/E7,
Huawei Honor 6, Lenovo Vibe X2, Yu Yureka +, Lumia 640XL…
आजची आणखी मोठी बातमी म्हणजे मारिओ ह्या गेमचे निर्माते निन्टेडो ह्यांनी त्यांची पहिली मोबाइल गेम सादर केली. इतके दिवस त्यांनी सर्व गेम्स Wii, Nintendo सारख्या गेम डिवाइसवरच ठेवल्या होत्या. आपल्यापैकी अनेकांनी मारिओ ही गेम नक्कीच खेळली असेल. त्यामुळेच अनेकांना या त्यांच्या गेमबद्दल उत्सुकता होती. या नव्या गेमचं नाव Miitomo असं आहे. ही गेम 2016 मध्ये उपलब्ध होणार आहे. यामध्ये आपल्या मित्रांसोबत सोशलनेटवर्क सारख्या वातावरणात गेम खेळायची आहे.
मात्र अनेकांना ह्या गेमची आयडिया अजिबात आवडली नसून ही बातमी आल्यापासून कंपनीचे शेअर मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. गुंतवणूकदारांना ही गेम अजिबात आकर्षक नसल्याचं वाटत आहे त्यामुळे त्यांची पूर्ण नापसंती जाहीर झालीये. बहुतांश गेमर्सना निंटेंडो मारिओचं अँड्रॉइड व्हर्जन सादर करेल असं वाटत होतं. आता पाहूया Miitomo जेव्हा उपलब्ध तेव्हा यूजरचा कसं प्रतिसाद लाभतोय ते….