मायक्रोसॉफ्ट लुमिया 950, सर्फेस बूक, बॅंड, होलोलेन्स सादर

बर्‍याच दिवसांपासून चर्चेत असलेला मायक्रोसॉफ्टचा फ्लॅगशिप फोन लुमिया 950 शेवटी काल त्यांच्या इवेंट मध्ये सादर करण्यात आला. सोबतच जगातला सर्वात स्लीम आणि ताकदवान लॅपटॉप देखील मायक्रोसॉफ्टने सादर केलाय! आजच्या लेखात वाचूया या प्रॉडक्टसोबत आणखी काय काय सादर झालय ते ….

मायक्रोसॉफ्ट लुमिया 950 आणि 950 XL : हे दोन फोन्स मायक्रोसॉफ्टने सादर केले असून त्यांच्या हार्डवेअरमध्ये थोडासा फरक सोडला तर बाकी काही वेगळेपण नाही. यामध्ये त्यांनी फोनच्या गरम होण्याच्या प्रॉब्लेमवर उपाय म्हणून लॅपटॉपसारखी लिक्विड कूलिंग सिस्टम दिली आहे! तसेच हा फोन पीसी सारखा चालेल असं त्यांचं म्हणणं आहे.

लुमिया 950 :

  • स्क्रीन : 5.2″ WQHD OLED डिस्प्ले 2560×1440 रेजोल्यूशन, गोरीलाग्लास 3      
  • प्रॉसेसर : हेक्सा कोर क्वालकॉम विंडोज 10 ओएस 
  • रॅम : 3जीबी 
  • स्टोरेज : 32जीबी इंटर्नल (Expandable upto 2TB!)
  • कॅमेरा : 20MP प्यूयरव्यू कॅमेरा + 5MP फ्रंट, कार्ल झईस लेन्स 4के विडियो शूटिंग, तीन एलईडीचा फ्लॅश  
  • पोर्ट : यूएसबी टाइप C सोबत फास्टचार्ज (50% बॅटरी अवघ्या अर्ध्या तासात चार्ज)
  • बॅटरी : 3000mAh  वायरलेस चार्जिंग सपोर्ट 
  • किंमत : $549 (रु. 35,500)  
लुमिया 950 XL
  • स्क्रीन : 5.7″ WQHD OLED डिस्प्ले 2560×1440 रेजोल्यूशन, गोरीलाग्लास 4      
  • प्रॉसेसर : हेक्सा कोर क्वालकॉम विंडोज 10 ओएस 
  • रॅम : 3जीबी 
  • स्टोरेज : 32जीबी इंटर्नल (Expandable upto 2TB!)
  • कॅमेरा : 20MP प्यूयरव्यू कॅमेरा + 5MP फ्रंट, कार्ल झईस लेन्स 4के विडियो शूटिंग, तीन एलईडीचा फ्लॅश  
  • पोर्ट : यूएसबी टाइप C सोबत फास्टचार्ज 5Gbps स्पीडने फाइल ट्रान्सफर ! 
  • (50% बॅटरी अवघ्या अर्ध्या तासात चार्ज)
  • बॅटरी : 3340mAh  वायरलेस चार्जिंग सपोर्ट, कूलिंग सिस्टम असलेला फोन  
  • किंमत : $649 (रु. ४२१२० )
सोबत एक एंट्री लेवल फोन लुमिया 550 सादर करण्यात आला ज्याची किंमत $139 (~रु9000) आहे, 5″ स्क्रीन, 8MP + 2MP कॅमेरा, 8जीबी स्टोरेज. ह्याची किंमत भारतात आणखी कमी असेल.      

डिस्प्ले डॉक : या छोट्या डिवाइसमुळे तुमच्या विंडोज फोनला पूर्ण पीसीमध्ये रूपांतरित करता येईल. तुमचा फोन या डिवाइस द्वारे मॉनिटरल जोडा आणि यूएसबी केबलने फोनजोडा की झाला तुमचा फोन पूर्ण पीसी 

हा डॉक विंडोज १० च्या यूनिवर्सल Apps चा फायदा उचलतो. उदा. तुमच्या फोनमध्ये ऑफिसचं मोबाइल व्हर्जन दिसेल मात्र जेव्हा तुम्ही या डिवाइसला जोडलं तेव्हा पीसी व्हर्जन दाखवलं जाईल.  
सर्फेस बूक : हा मायक्रोसॉफ्टचा पहिलाच लॅपटॉप. पहिलीच एंट्री दमदार केलेली दिसत आहे. हा लॅपटॉप अल्टिमेट असल्याचा दावा मायक्रोसॉफ्टने केलाय. यामध्ये लॅपटॉप स्क्रीनचं hinge (ज्या भागातून लॅपटॉपचा अॅंगल बदलला जातो) त्याचं एकदम नवं आणि आकर्षक डिजाइन आणलं आहे. हा लॅपटॉप सर्फेस पेनल सुद्धा सपोर्ट करतो आणि विशेष म्हणजे याचा डिस्प्ले सहज काढून घेता येतो !!!
फीचर्स : 13.5″ डिस्प्ले, 16जीबी पर्यन्त रॅम, 12तासांची बॅटरी लाइफ, इंटेल लेटेस्ट प्रोसेसर,  
किंमत : $1,499 (for the 128GB/8GB Core i5, Intel HD graphics)
             $2,699.00 (512GB/16GB, Core i7, NVIDIA GPU)

या सोबतचं त्यांनी सर्फेस टॅब्लेट सिरीजमध्ये आणखी एका टॅब्लेटला लॉंच केलं सर्फेस प्रो 4
आणखी एक प्रॉडक्ट म्हणजे मायक्रोसॉफ्ट फिटनेस बॅंड : मायक्रोसॉफ्टने याधीच्या बॅंडमध्ये असलेल्या त्रुटि दूर करून हा बॅंड आता अँड्रॉइड, विंडोज, iOS या सर्वांना वापरता येईल असा बनवला आहे.

होलोलेन्स गेमिंग XRay :

   
काल दिलेल्या माहितीनुसार विंडोज १० आता तब्बल ११० मिलियन डिवाइसवर सुरू आहे! (११०० लाख)
विंडोज १० फोन्ससाठी अपडेट डिसेंबरमहिन्यात देण्यास सुरवात केली जाईल. यासाठी सध्यातरी ८जीबी स्टोरेज आणि डेनिम अपडेट इंस्टॉल केलेलं असलं पाहिजे.    

    
Exit mobile version