IFA(Internationale Funkausstellung) हा जर्मनी मध्ये पार पडत असलेला काही सर्वात जुन्या इंडस्ट्री कार्यक्रमांपैकी एक आहे. यावेळी हा कार्यक्रम बर्लिनमध्ये भरला असून नेहमीप्रमाणे कंपन्यामध्ये आपापले उत्पादन सादर करण्यासाठी जोरदार स्पर्धा दिसून येत आहे. सोनी Z5, असुस ZenWatch2, योगा 3 प्रो हे खास आकर्षण ठरत आहेत. तर पुढे पाहूया कोणत्या कंपनीने काय सादर केल आहे ते …
सोनी (Sony)
- एक्सपीरिया Z5 : जगातला सर्वात पहिला 4K डिसप्ले असलेला फोन! जबरदस्त फीचर्स, 5.5″ स्क्रीन, 4G, वॉटरप्रूफ+डस्टप्रूफ, 3जीबी रॅम, अँड्रॉइड 5.1.1, 23MP कॅमेरा!
- सोनी 3D विस्युयलअसलेला 4K प्रॉजेक्टर ! TRILUMINOS डिस्प्ले प्रोजेक्ट करण्याची क्षमता!
सॅमसंग (Samsung)
- सॅमसंगने जगातला पहिला अल्ट्रा एचडी ब्ल्यु रे प्लेयर सादर केला. यामध्ये UHD सोबत ब्ल्यु रे विडियो प्ले करता येतील. सुस्पष्ट डिसप्ले क्वालिटीमुळे विडियो पाहण्याचा आनंद अधिक वाढेल असं सॅमसंगने सांगितले.
- गॅलक्सी टॅब S2 : उच्च प्रतीचा टॅब्लेट, 32जीबी स्टोरेज,रु 39400, मेड इन इंडिया
लेनेवो (Lenovo)
- मायक्रोसॉफ्टच्या सर्फेस सारखा Miix 700 नावाचा 12″ स्क्रीन असलेला टॅब्लेट ,
- योगा टॅब 3 प्रो हा प्रॉजेक्टर असलेला टॅब्लेट
- योगा थिंकपॅड 260, 460
- Vibe P1 : 5000mAh बॅटरी, दुसर्या फोन्सना देखील चार्ज करता येईल इतकी बॅटरी!
- Vibe सिरीज फोन्स
- गेमिंग लॅपटॉप, IdeaCentre ऑल इन वन पीसी
असुस (Asus)
- ZenFone झूम : 3X ऑप्टिकल झूम !
- Revo Build PC : स्वतः पार्ट एकावर एक जोडून बनवता येणारा पीसी
- Vivo स्टिक : विंडोज 10 मिनी पीसी
- ZenWatch 2
- RT-AC5300U सर्वात वेगवान राऊटर !
तोशिबा (Toshiba)
मोटोरोला (Motorola)
- मोटो 360 स्मार्टवॉच 2 : अधिक सुविधा, वायफाय, गोलाकार, अधिक पट्ट्या.
हयुवाई (Huawei)
- G8 स्मार्टफोन : पूर्ण मेटल बॉडी, फिंगरप्रिंट स्कॅनर
- Mate S : फोर्स टच असलेला फोन : फोनवर ठेवलेल्या वस्तूच वजन सांगू शकतो!
एसर (Acer)
- लिक्विड सिरीज फोन्स सोबत 2 विंडोज 10 फोन्ससुद्धा
- Predator गेमिंग टॅब्लेट
- गेमिंग लॅपटॉपची नवी सिरीज
इंटेल (Intel)
- Skylake प्रॉसेसर लॅपटॉपसाठी आणि कम्प्यूटिंग स्टिकसाठी
Note : यातील काही प्रॉडक्ट IFA मध्ये सादर झालेले नसून याच काळात सादर झाले आहेत म्हणून त्यांचा या लेखात समावेश केला आहे