जीमेलने आज अधिकृतरीत्या Undo Send पर्याय जोडलाय ज्यामुळे आपण एखादा ईमेल अर्धवट किंवा चुकून सेंड केला तर आपण ती क्रिया रद्द करू शकतो ! खरेतर जीमेलने ही सुविधा 6 वर्षांपूर्वीपासून सुरू केली आहे मात्र केवळ काही टेस्टिंग कारणांसाठीच…. पण आता ही सोय सर्वांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Gmail Undo Send कसे करावे ?
- जीमेल वर जा आणि लॉगिन करा > mail.google.com
- उजव्या कोपर्यात वरच्या बाजूला सेटिंग्सच चिन्ह
असेल तिथे क्लिक करा आणि Settings निवडा - इथे Undo Send विभाग दिसेल
- त्यातून तुम्हाला किती सेंकंदासाठी ही सुविधा हवी आहे म्हणजे किती सेकंडचा अवधी तुम्हाला Undo करण्यासाठी हवा आहे तो निवडा (5/10/20/30Sec)
- आणि इथून पुढे Your message has been sent च्या बाजूला Undo नावाचा पर्याय दिसेल!
विशेष म्हणजे Gmail च्या नव्या अपडेटमध्ये outlook, Yahoo चे ईमेल देखील Gmail App मधूनच पाठवता येण्याची देखील सोय केलेली आहे !