दरवर्षीप्रमाणे अॅपलचा इवेंट काल (WWDC 2015) पार पडला. अॅपलने काही जुन्या प्रॉडक्टमधील सुधारणा आणि काही नव्या गोष्टी जाहीर केल्या. त्याविषयी एक आढावा ….
OS X ऑपरेटिंग सिस्टमचं पुढचं व्हर्जन : अॅपलने OS X 10.11/Capitan सादर केली. हे व्हर्जन yosmite वर काही सुधारणा करून सादर केलं गेलय.
- Spotlight Improvements : आता जर तुम्ही Photos from July असं सर्च केलं तर जुलैमहिन्यात काढलेले फोटोज दाखवले जातील! यासोबत आणखी बरेच शब्द ओळखण्याचे काम नवीन ओएस करेल.
- App Improvements : Apps मध्ये देखील बर्याच अंशी सुधारणा केली असून सफारी मध्ये त्यानुसार काही बदल करण्यात आले आहेत.
- विंडो मॅनेजमेंट : आता स्क्रीन हव्या तश्या ड्रॅग करून पाहता येण्याची सोय मात्र ही सोय केवळ iPad Air 2 लाच मिळेल.
- परफॉर्मेंस : Apps उघडण्याची वेळ, Apps निवडण्याची वेळ, PDF उघडण्याचा वेळ आता जवळपास निमम्याने कमी कमी केला गेलाय.
OS X अपडेट सर्वांना मोफत मिळेल.
iOS 9 : सिरी वॉइस assistant आता अधिक स्मार्ट, फोन नंबर ओळखण्याची सोय, सर्च स्क्रीनला नवं डिजाइन, Maps मध्ये आता ट्रॅफिक बद्दल देखील माहिती मिळणार, PIP विडियो प्लेबॅक, …
App Store ने गाठलाय 100 बिलियन डाऊनलोडचा टप्पा !
Swift प्रोग्राममिंग भाषा आता ओपन सोर्स करण्यात येईल.
अॅपल वॉच साठी नवं व्हर्जन watchOS2 , अधिक वॉचफेसेस, नाइट मोड, नेटीव Apps