नेट न्यूट्रॅलिटी : एक गरज

आजकाल हा शब्द खूप ठिकाणी ऐकायला मिळत आहे. पण यामागच कारण जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण करूया …
नेट न्यूट्रॅलिटी म्हणजे काय ?
  • नेट न्यूट्रॅलिटी म्हणजे असं तत्व ज्याद्वारे इंटरनेट सर्विस देण्यार्‍या कंपन्यानी(ISPs) आणि सरकारने इंटरनेटवरील सर्व माहितीला समान वागणूक दिली पाहिजे. कोणत्याही यूजरला ठराविक वेबसाइट, माहिती साठी वेगळे पैसे न घेता सर्व सुविधा एकाच दरात दिल्या पाहिजेत. एयरटेल, डोकोमो, रिलायन्स, आयडिया, वोडाफोन अश्या काही प्रसिद्ध इंटरनेट सर्विस देण्यार्‍या कंपन्या भारतात आहेत. 
  • थोडक्यात जर तुम्ही एखादा इंटरनेट पॅक घेतला असेल पण तुम्हाला यूट्यूब वापरण्यासाठी वेगळा चार्ज द्यावा लागेल किंवा जर तुम्ही चार्ज नाही दिला तर तुम्हाला यूट्यूब वापरता येईल मात्र ज्यांनी चार्ज दिलाय त्यांच्यापेक्षा कमी वेगाने ! तसेच कमी चार्ज मध्ये कमी स्पीड अधिक स्पीड साठी वेगळा चार्ज यामुळे यूजरना तो चार्ज देणं भाग पडत आणि टेलीकॉम कंपनीला फायदा होतो! यालाच नेट न्यूट्रॅलिटी भंग करणे म्हणतात. 
  • नेट न्यूट्रॅलिटीचा अर्थ इंटरनेटवरील सर्व माहिती सर्व वेबसाइट सर्वांना समान स्पीडने कायम वापरता येणे आणि तेही कोणत्याही टेलीकॉम ऑपरेटरसोबत कोणत्याही अटीशिवाय .. 
  • जसे की एयरटेलसाठी, एयरटेल WhatsApp वापरण्याकरता तुमच्याकडून वेगळा चार्ज घेऊ शकेल मात्र त्याचवेळी Hike हे App मात्र फ्री उपलब्ध असेल याच कारण लोकांनी त्यांचं Hike अॅप्लिकेशन वापरावं अशी त्यांची इच्छा असेल.    
  • अमेरिकेत सुद्धा भारताप्रमाणे टेलीकॉम कंपनी नेट न्यूट्रॅलिटी भंग करण्याच्या प्रयत्नात होत्या मात्र तिथल्या लोकांच्या तीव्र विरोधामुळे कंपन्यांना माघार घ्यावी लागली 

खालील  वेबसाइटनी नेट न्यूट्रॅलिटीबद्दल मोठ्या प्रमाणात ऑनलाइन आंदोलन उभारलय. याच वेबसाइट वर तुम्ही नेट न्यूट्रॅलिटीबद्दलच्या सध्याच्या घडामोडी पाहू शकाल. आणि तुमचा सहभाग सुद्धा तितकाच महत्वाचा आहे त्यामुळं या सर्वांना सहकार्य करत नेट न्यूट्रॅलिटीला पाठिंबा देऊया. मराठीटेकचा देखील नेट न्यूट्रॅलिटीला पूर्ण पाठिंबा आहे. 

याविषयी भारतातील TRAI या टेलीकॉम अथॉरिटीने इंटरनेट वापरकर्त्यांकडून नेट न्यूट्रॅलिटी लागू करावी का नको याविषयी 20 प्रश्नांचा लांबलचक पेपर प्रसिद्ध केला होता. ज्याला त्यांनी केवळ 24 एप्रिल पर्यंतच मुदत दिली होती यादरम्यान जर त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसता तर भारतात नेट न्यूट्रॅलिटी लागू करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण भारतातील काही जागरूक वापरकर्त्यांनी व काही संस्थांनी याविरुद्ध आवाज उठवत मोठी जनजागृती केलीय त्यामुळं 24 एप्रिल पर्यन्त TRAI कडे तब्बल 2 लाख लोकांनी प्रतिसाद पाठवले आहेत. मात्र TRAI ने लोकांच्या प्रायवसीबद्दल काळजी न घेता सर्वच्या सर्व ईमेल आयडी पब्लिक केले ! ज्याचा परिणाम एका हॅकर ग्रुपने TRAI ची वेबसाइट हॅक केली!  
या सर्व गोष्टींना त्यावेळी विरोध सुरू झाला जेव्हा एयरटेलनी त्यांचा Airtel Zero नावाचा प्लॅन सादर केला ज्या प्लॅन मध्ये ठराविक वेबसाइट जर ठराविक प्लॅन घेतला तर फ्री वापरता येतील. या प्लॅन मध्ये फ्लिपकार्टने देखील सहभाग घेतला आणि याचा अनेकांनी निषेध नोंदवला. यूजर्सनी फ्लिपकार्टच्या गूगल प्ले वरील apps रेटिंगला सरळ 1 स्टार देण्यास सुरवात केली आणि तेव्हा फ्लिपकार्टला जाग आली आणि त्यांनी एयरटेल Zero व internet.org या दोन्ही प्लॅटफॉर्म वरून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. मार्क झुकरबर्गने मात्र internet.org नेट न्यूट्रॅलिटीच्या विरोधात नसल्याचं मत मांडलय. 

काही सेलेब्रिटी व पक्ष यांनी देखील नेट न्यूट्रॅलिटीला पाठिंबा जाहीर केलाय जसे की कोंग्रेस, आम आदमी पक्ष, शाहरुख खान, रितेश देशमुख, फरहान अख्तर, सिद्धार्थ मल्होत्रा, सोनाक्षी, आलिया, परिणीती, वरुण, अर्जुन, बिपाशा, इ. या नेट न्यूट्रॅलिटीबद्दलच्या आंदोलनाला काही Apps व वेबसाइटनी स्वतः पाठिंबा दिला आहे जसे की  Zomato,  Amazon, MakeMyTrip, ClearTrip, Nasscom, IITs, IIMs, IISc


   
AIB ह्या ऑनलाइन यूट्यूब चॅनलने देखील (प्रथमच!) चांगल्या गोष्टीला सपोर्टसाठी जनजागृती करत हा विडियो प्रसिद्ध केला होता. अल्पवधीतच viral होऊन अनेक लोकांपर्यंत नेट न्यूट्रॅलिटीबद्दल माहिती पोचली. 

Exit mobile version