गेल्या काही वर्षांमध्ये मायक्रोसॉफ्टच्या इवेंटमध्ये काय होणार याची जवळपास सर्वच माध्यमांना आधीच खबर असायची. मात्र यावेळच्या इवेंटमधील काही गोष्टी अतिशय गुप्त ठेवण्यात मायक्रोसॉफ्ट यशस्वी झालं. दिनांक २१ जानेवारी रोजी झालेल्या इवेंटमध्ये मायक्रोसॉफ्टने अनेक भन्नाट प्रोडक्टस सादर केली.
विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टम Win ७, Win ८ & Win ८.१ वापरणार्या यूजर्सना एक वर्ष मोफत दिली जाणार आहे ! मायक्रोसॉफ्टचं हे एक मोठ पाऊल म्हणावं लागेल. ह्या निर्णयाला विंडोज ८ वरील यूजर्सची नाराजीच कारणीभूत ठरली. मात्र या मोफत स्कीमसाठी तुमच्याकडील ओएसदेखील ओरिजिनल असावी लागेल (भारतात जास्त लोक पायरेटेड ओएस वापरतात)
पीसी : स्टार्ट मेनू विंडोज 8 प्रमाणे नसणार तर त्याऐवजी स्टार्ट मेनू रिडिजाइन करण्यात आला आहे. उजव्या बाजूला अॅक्शन सेंटर देण्यात आला आहे. तसेच अनेक बदल करण्यात आले आहेत जे पीसीवर काम करण अधिक सोपं बनवतील. विंडोज Apps आता लहान साइज मध्ये देखील पाहता येतील.
कोर्टाना : मायक्रोसॉफ्टचा वॉइस असिस्टेंट कोर्टाना जो अॅक्चुअली विंडोज फोनवर उपलब्ध आहे तो आता विंडोज 10 पीसीवर देखील उपलब्ध करण्यात आला आहे. कोर्टाना ही अॅक्चुअली Halo या गेम मधली कॅरक्टर आहे तीच नाव या असिस्टेंटला देण्यात आलय. आपल्या कोणत्याही प्रश्नाच उत्तर कोर्टाना सहज देईल.
यूनिवर्सल अॅप्स : आजपर्यंत फोन,टॅब्लेट, लॅपटॉप, पीसी अश्या प्रत्येक डिवाइससाठी वेगळी सॉफ्टवेअर बनवावी लागायची मात्र विंडोज 10 या सर्व डिवाइसना सपोर्ट करेल. मायक्रोसॉफ्टने इवेंटवेळी काही ऑफिस अॅप्ससुद्धा सादर करून दाखवली. सॉफ्टवेअर इंडस्ट्रीत एकप्रकारची क्रांतीच म्हणावी लागेल.
एक्सबॉक्स : मायक्रोसॉफ्टने एक्सबॉक्स आता पीसीवरच उपलब्ध करून दिलं आहे. जर तुमच्याकडे एक्सबॉक्स असेल तर तुमच्या विंडोज 10 पीसी वर देखील एक्सबॉक्स गेम्स वापरू शकता, मित्रांना मेसेजेस, स्क्रीनरेकॉर्ड पाठवू शकता. डायरेक्टएक्स 12 चा सपोर्ट हे देखील याच एक वैशिष्ठ्य. एक्सबॉक्सवर मायक्रोसॉफ्टच खास लक्ष दिसून येत आहे.
सर्फेस हब : मायक्रोसॉफ्टने आणखी एक नवं टच डिवाइस सादर केल आहे हे मुख्यतः टीम मध्ये ग्रुप मीटिंग करताना उपयोगी पडेल. 84 इंच डिसप्ले असलेल हे मॉनिटर सारखं डिवाइस विंडोज 10 वर चालेल. एका वेळी दोन मेंबर्ससोबत स्काइपवरुन कॉल करून त्यांनाही ह्यात सहभागी करता येईल. ह्या डिवाइसमध्ये 4K डिसप्ले, 1080 रेजोल्यूशनचे 2 विडियो कॅमेरा, आणि मायक्रोफोन व कायनेक्ट टेक आहे.
स्पार्टन ब्राऊजर : या ब्राऊजरबद्दल माहिती आधीच लीक झाली होती. हा फोन प्रथमतः विंडोज फोनवर सादर करण्यात येईल. ह्यामध्ये Pocket App सारखे नोट घेण्याचे फीचर आहे, तसेच वेबसाइटवरील ठराविक पार्ट शेअर करता येईल व नंतर वाचण्यासाठी Reader मध्ये साठवता येईल.
वरील प्रोडक्टस स्पष्ट करणार्या विडिओजची प्लेलिस्ट पोस्टच्या शेवटी दिलेली आहे, ती नक्की पहा….
विंडोज होलोग्राफिक : मायक्रोसॉफ्टने क्रांतिकारी टेक्नॉलजी सादर केली आहे जिला त्यांनी होलोलेन्स असं नाव दिलय. मायक्रोसॉफ्ट होलोलेन्स कंपनीने बनवलेल सर्वात इनोवेटीव प्रॉडक्ट आहे. आजपर्यंत सायन्स फिक्शन असणार्या होलोग्राम्सना सायन्स फॅक्ट बनवण्याचा प्रयत्न झालाय. अत्यंत भन्नाट असं हे प्रॉडक्ट आपल्याला आपल्या रूम मध्ये फिरत फिरत असताना आपण गेममध्ये स्वतः फिरत असल्याचा अनुभव देईल. हवेत बोटे फिरवून 3डी आकार बनवता येतील.
अधिक सोप्या पद्धतीने ही टेक्नॉलजी समजण्यासाठी खालील विडियो पाहाच….