
आयफोन 6 बद्दल काही ग्राहकांच्या अशा तक्रारी आल्या आहेत की फोनला थोडा जोर लावल्यास आयफोन चक्क वाकडा होतोय. अॅपलच्या बाबतीत अश्या तक्रारी आल्यामुळे सर्वत्र चर्चा सुरू झाली होती मात्र आता यावर अॅपलकडून प्रतिक्रिया अलीये की अश्या वक्र होणार्या फोन्सच्या फक्त 9 तक्रारी त्यांच्याकडे आल्या असून आम्ही जवळपास 15000 फोन्सची स्ट्रेस टेस्ट केली आहे ज्यात असा कोणताच प्रॉब्लेम आढळला नाहीये.
फील शिलर (अॅपल व्हीसी ऑफ मार्केटिंग) यांनी असं म्हटलं आहे की आयफोन साठी वापरलेली प्रत्येक गोष्ट बेस्ट फीचर्स असलेली आहे. unibody कन्स्ट्रकशन, हाय क्वालिटी अॅल्युमिनियम, इंडस्ट्रीतिल सर्वात मजबूत ग्लास इ. म्हणून अॅपलने काही पत्रकारांना बोलावून त्यांच्यासमोर ह्या स्ट्रेस टेस्ट केल्या आहेत.
अॅपल सर्वसाधारणपणे टेस्टिंग लॅब मीडियाला ओपन करत नाही पण 2010 साली सुद्धा अश्याच काही तक्रारींमुळे लॅब खुली करण्यात आली होती.
सध्या अॅपलच्या iOS8 अपडेट मध्ये सुद्धा काही त्रुटि आढळल्यामुळे काही काळ अपडेट प्रोसेस बंद करण्यात आली व iOS 8.0.2 अपडेट आणल गेल.
स्टीव जॉब्सच्या निधनानंतर अॅपलमध्ये पोकळी निर्माण झालीये हे नक्की कारण त्याच्या हयातीत त्याच्या perfection मुळे अश्या चुका कमी असायच्या.
स्टीव जॉब्सच्या निधनानंतर अॅपलमध्ये पोकळी निर्माण झालीये हे नक्की कारण त्याच्या हयातीत त्याच्या perfection मुळे अश्या चुका कमी असायच्या.
पहा एका ऑस्ट्रेलियन महाभागाच्या (आयफोन 6 चा पहिला ग्राहक) हातातून नवा कोरा आयफोन उत्साहाच्या भरात कसा पडला ते …..