Micromax Logo |
मायक्रोमॅक्सने 2010 साली मोबाइल बाजारात पाऊल ठेवलं होतं. आता ही चार वर्ष जुनी कंपनी मोबाइल शिपमेंट मधे सॅमसंगला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर विराजमान झाली आहे. जगात सुद्धा मायक्रोमॅक्स ओळख निर्माण करण्यात चांगलीच यशस्वी झाली आहे. CES 2014 मधे LapTab सारखी प्रॉडक्ट सादर करून अनेकांना त्यांची नोंद घ्यायला भाग पाडलं.
सॅमसंगला सध्या चायनिज कंपन्याची टक्कर कमी म्हणून की काय आता मायक्रोमॅक्स, कार्बन अशा भारतीय मोबाइल कंपन्या जबरदस्त धक्के देत आहेत. मायक्रोमॅक्स सध्या 16.6 % मार्केट शेअर सोबत मोबाइल विकणार्या कंपनीमध्ये प्रथम तर सॅमसंग 14.4%, नोकिया 10.9%, कार्बन 9.5% आणि लावा 5.6 % ही माहिती CounterPoint रिसर्च या संस्थेने दिली असून Q2 2014 साठीची आहे.
कॅनवस एचडी, कॅनवस 4, कॅनवस नाइट असे फोन पटापट विकले जाऊ लागले आणि 2013 वर्षी मायक्रोमॅक्सने चक्क बलाढ्य नोकिया सॅमसंगला मागे टाकलं. यानंतर हॉलीवुड सुपरस्टार Hugh Jackman ला ब्रॅंड ambassador बनवलं सोबतच रशियन मार्केट मध्येही उडी घेतली.टीव्ही ad साठी Fast & Furious मूवीच्या डायरेक्टरना घेऊन प्रभावी जाहिराती बनवत घराघरात ब्रॅंडनेम पोचवण्यात सहजता मिळवली.
मायक्रोमॅक्सच्या सीईओ दीपक मेहताच असं म्हणणं आहे की त्यांच्या यशाचं रहस्य सर्वसामान्य जनतेपर्यंत मोबाइल स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न . ज्यात भारतीयत्वाचा मुद्दा महत्वाचा ठरतो .
मायक्रोमॅक्स विंडोज फोन 8.1 वरती आधारित फोन सादर करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. आता कंपनी टीव्ही उत्पादन सुरू करत आहे ज्यात देखील अशीच कामगिरी करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. एक भारतीय कंपनी असे यश मिळवत असेल त्याचा आपणा सर्वांना अभिमान हवा . मराठीटेक तर्फे मायक्रोमॅक्सच्या भावी कारकिर्दीला शुभेच्छा .