XiaoMi या चिनी कंपनीने भारतीय स्मार्टफोन बाजारात दिमाखात एंट्री केली आहे. चीनची अॅपल म्हणून समजली जाणारी ही कंपनी आता भारतात स्मार्टफोन्स विक्री सुरू करत आहे. सध्या फ्लिपकार्टच्या माध्यमातून ऑनलाइन बूकिंग सुरू झाले असून साधारण एका आठवड्यात प्रत्यक्ष उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कंपनीने 20 शहरात सर्विस सेंटर उघडली असून एचसीएल सारख्या कंपन्याशी त्यासाठी करार केला आहे.
ह्या कंपनीचा जाहिरातीचा खर्च जास्त नसून सोशल नेटवर्किंगमुळे ह्या कंपनीला चीनी बाजारपेठेत जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. भारतात सुद्धा अशीच आक्रमक किंमत ठेऊन सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ काबिज करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. फ्लिपकार्टवरती सध्या रजिस्टरकरून हा फोन 22 जुलैला उपलब्ध होईल. खास अशा इतर accessories सुद्धा कंपनी सादर करणार आहे.
Mi3 फीचर्स ::
डिस्प्ले :: 5-inch IPS LCD display with
1920×1080 pixel resolution
(pixel density of 441 pixels per inch.)
प्रॉसेसर :: quad-core 2.3 GHzQualcomm Snapdragon 800 mobile chipset,
रॅम :: 2 GB RAM
इंटेर्नल स्टोरेज :: 16 GB
(pixel density of 441 pixels per inch.)
प्रॉसेसर :: quad-core 2.3 GHzQualcomm Snapdragon 800 mobile chipset,
रॅम :: 2 GB RAM
इंटेर्नल स्टोरेज :: 16 GB
(no expandable memory slot)
कॅमेरा :: 13 megapixel rear camera(Sony Exmor RS sensor) , 2 megapixel front camera
बॅटरी :: 3050 mAh battery
अधिक माहितीसाठी येथे भेट द्या http://www.mi.com/in/
Mi3 Rs 13,999
Redmi 1s Rs 6,999
Redmi Note at Rs 9,999.
Redmi 1s Rs 6,999
Redmi Note at Rs 9,999.
Update (२९-०७-२०१४) ::
शियोमीचे फोन फ्लिपकार्टवरती उपलब्ध झालेला आहे मात्र हा फोन एकदा ३९ मिनीट्स मध्ये आणि एकदा ५ सेकंडमध्येच (!!!!!) आऊट ऑफ स्टॉक झालाय. ग्राहकांच्या याबाबतीत प्रचंड तक्रारी येत असून शियोमी किंवा फ्लिपकार्ट यांचा नेमका प्लॅन काय आहे ते समजण अवघड आहे.