अकरावीची पहिली कटऑफ लिस्ट लागली आहे. अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे कॉलेज न मिळाल्याने त्यांची निराशा होणार आहे. पण हव्या त्या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळालं नाही तरी पूर्णपणे निराश व्हायचं कारण नाही. कारण त्यातल्या एखाद्या प्रसिद्ध लेक्चररचं लेक्चर तुम्हाला यूट्यूबवर सहज बघायला मिळू शकतं. केवळ आयआयटी किंवा इंजिनीअरिंग कॉलेजांमध्येच नव्हे तर आर्टस-सायन्स-कॉमर्स कॉलेजांमध्येही, त्यांची विशिष्ट लेक्चर्स यूट्यूबवर टाकली जातात. त्यामुळे ती बघण्याची संधी अनेक विद्यार्थ्यांना मिळतेय. अनेक कॉलेजं हळूहळू हा फंडा राबवताना दिसतायत.
पाश्चिमात्य देशांमध्ये वेब आणि व्हिडीओजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं. जॉब करणाऱ्या किंवा नियमितपणे कॉलेजला न जाऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा खूप उपयोग होतो. व्हर्चुअल क्लासरूममुळे त्यांना मिस झालेली लेक्चर्स ऐकता येतात. हा ट्रेंड भारतातही दिसून येत असून आयआयटी आणि कित्येक इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये व्हिडीओजच्या माध्यमातून शिकवलं जातं.
या प्रकारच्या शिक्षणपद्धतीचे फायदे लक्षात घेऊन विद्याविहारच्या के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सनं व्हर्चुअल क्लासरूम्सचा फंडा अधिक प्रभावीपणे वापरायला सुरूवात केली आहे. यामध्ये वर्गात लेक्चर सुरु असताना त्याचे व्हिडिओ शूटिंग केलं जातं. ते नंतर यू-ट्यूबवर अपलोड केलं जातं. यातील काही व्हिडिओज मुंबई युनिव्हर्सिटीच्या व्हर्चुअल स्टुडिओमध्ये सुद्धा शूट केले गेले आहेत. या प्रकारे आत्तापर्यंत गणित, स्टॅटिस्टिक्स यांसारख्या विषयांचे लेक्चर्स शूट करून त्याचे आतापर्यंत जवळपास ५० व्हिडिओज बनविले गेले आहेत.
सोमय्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाला पसंती दिली आहे. विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद प्रतिसाद बघून याप्रकारे आणखीही व्हिडिओज लवकरच अपलोड केले जात आहेत. याचबरोबर व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियाचा वापरही केला जातोय. ग्रूप्सवर शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शंकेचं निरसन करणं हेदेखील अनेक कॉलेजांमध्ये केलं जातं. काही वेळा इंटर्नल परीक्षांमधले छोटे-छोटे ऑब्जेक्टीव्ह प्रश्न एसएमएसच्या माध्यमातून विचारले जातात.
पाश्चिमात्य देशांमध्ये वेब आणि व्हिडीओजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं. जॉब करणाऱ्या किंवा नियमितपणे कॉलेजला न जाऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा खूप उपयोग होतो. व्हर्चुअल क्लासरूममुळे त्यांना मिस झालेली लेक्चर्स ऐकता येतात. हा ट्रेंड भारतातही दिसून येत असून आयआयटी आणि कित्येक इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये व्हिडीओजच्या माध्यमातून शिकवलं जातं.
सोमय्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाला पसंती दिली आहे. विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद प्रतिसाद बघून याप्रकारे आणखीही व्हिडिओज लवकरच अपलोड केले जात आहेत. याचबरोबर व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियाचा वापरही केला जातोय. ग्रूप्सवर शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शंकेचं निरसन करणं हेदेखील अनेक कॉलेजांमध्ये केलं जातं. काही वेळा इंटर्नल परीक्षांमधले छोटे-छोटे ऑब्जेक्टीव्ह प्रश्न एसएमएसच्या माध्यमातून विचारले जातात.
कल्पना पाटील, कॉलेज क्लब रिपोर्टर
सर्वात मोठी online lectures लायब्ररी यूट्यूब वरती ::::—-
खान अकॅडेमी तर्फे https://www.youtube.com/user/khanacademy