नोकियाचा अँड्रॉइड स्मार्टफोन ‘X2’ लॉन्च; जाणून घ्या, ‘X’ पेक्षा काय आहे खास!

NOKIA ने अँड्रॉइड सीरीजमधील आपला पहिला स्मार्टफोन ‘X’चे नवे व्हर्जन मंगळवारी सादर केले. ‘NOKIA X2’ असे या मॉडेलचे नाव आहे. मागील अनेक दिवसांपासून इंटरनेटवर अनेक वेबसाइटने ‘NOKIA X2’चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशनबाबत माहिती दिली जात होती. NOKIAची ‘X’ सीरीज अँड्रॉइड व्हर्जन असल्याने खूप लोकप्रिय होत आहे. 
किंमत-
NOKIA कन्वर्सेशन ब्लॉगवर ‘NOKIA X2’च्या किंमतीबाबत खुलासा केला आहे. लिस्टिंगनंतर अनेक देशांमध्ये हा फोन उपलब्ध करून दिला जाणार आहे. NOKIA X2 कोण-कोणत्या देशात विक्रीसाठी उपलब्ध होईल, याबाबत माहिती समजू शकलेली नाही. ‘NOKIA X2’ किंमत 8100 रुपये (कर वगळून) आहे.

NOKIAचा अँड्रॉइड स्मार्टफोन 'X2' लॉन्च; जाणून घ्या, 'X' पेक्षा काय आहे खास!

* रॅम-
NOKIA X2 मध्ये 1 GB ची रॅम आहे. याआधी NOKIAने लॉन्च केलेल्या XL आत्रर X+ मध्ये 768 MBची रॅम होती. याशिवाय ‘NOKIA X’मध्ये 512 MBची रॅम देण्यात आली आहे. 1 GB ची रॅम असल्याने ‘NOKIA X2’मध्ये हेव्ही गेम्स आणि अॅप्स देखील डाउनलोड करता येऊ शकतात. नव्या ‘NOKIA X2’मध्ये मल्टीटास्किंग कॅपेबिलिटी ही NOKIAच्या X, X+ आणि XL या व्हर्जनच्या तुलनेत जास्त आहे.

* स्क्रीन साइज-
‘NOKIA X2’चा स्क्रीन 4.3 इंचाचा आहे. NOKIA X आणि X+ चा स्क्रीन 4 इंचाचा आहे. हालांकि, NOKIA XLचा स्क्रीन 5 इंचाचा आहे. परंतु, NOKIA X चे सक्सेसर असल्याने X2 स्क्रीन फीचर्स शानदार आहेत.

* डिझाइन-
NOKIA X2 चे डिझाइन X सीरीजच्या बहुतेक स्मार्टफोन्सशी मिळतेजुळते आहे. यात एक ट्रान्सल्यूसेंट लेअर आहे, त्यामुळे फोनला मॅटॅलिक लूक प्रदान करते. या लेअरमुळे फोनच्या बॉडीचा लूक ग्लॉसी दिसतो.
NOKIA X2 हा ब्लॅक, ग्रीन, ऑरेंज, ग्रे, व्हाइट आणि येलो कलरमध्ये लॉन्च झाला आहे. फास्ट लाइन फीचरमुळे NOKIA X2 मध्ये नॅव्हिगेट करणे सहज शक्य आहे. NOKIA कन्वर्सेशन ब्लॉगनुसार, या फोन मध्ये मल्टीटास्किंग आधी पेक्षा चांगल्या पद्धतीने केली जाऊ शकते. यूजर्सला इव्हेंट्सचे नोटिफिकेशनही सहज पाहाता येते. याशिवाय, फास्टलाइन फीचरच्या मदतीने यूजर्सद्वारा नुकतेच वापरण्यात आलेले अॅप्स पाहता येते. या सोबत वन टच फीचरमुळे नव्या अॅप्स लॉन्च केल्या जाऊ शकतात. तसेच नोटिफिकेशनचा रिप्लाय देखील पाठवता येतो. ‘apps list’ फीचर जोडण्यात आले आहे. त्यामुळे होम स्क्रीनवरील अनेक अॅप्सचे आयकॉन साफ करता येतील. NOKIA ल्युमिया सीरीजमध्ये हे फीचर्स आढळते.

यूजर्स स्क्रीनच्या हिशेबाने कस्टमाइज देखील करू शकतात. यासाठी फोनमधील टाइल कलर पिकर (tile color-picker) फीचरचा वापर करता येतो.

* हार्डवेअर-
NOKIA X2 मधील हार्डवेअर फीचर्स NOKIA X पेक्षा अद्ययावत आहे. 4.3 इंचा क्लिअर ब्लॅक LCD डिस्प्ले स्क्रीनसोबत 217 पिक्सल प्रति इंचाची डेन्सिटी मिळते. मात्र, स्क्रीन रेझोल्युशनबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
पॉवरच्या बाबतीलत हा फोन ड्युअल कोर स्नॅपड्रॅगन 200 प्रोसेसरसोबत येतो. या प्रोसेसरचा स्पीड 1.2 GHz इतकी आहे. यासोबत 1 GB रॅममुळे चांगला स्पीड मिळतो. यापूर्वी लॉन्च झालेल्या नोकियाच्या अँड्रॉइड X सीरीज मधील (NOKIA X, X+,XL) मध्ये ड्युअल कोर प्रोसेसर देण्यात आले आहे. NOKIA X2 मध्ये ड्युअल सिम कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे.
इंटरनल मेमरी आणि मेमरी कार्ड स्टोरेजबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

* अॅप्स-
NOKIA X2 सोबत मायक्रोसॉफ्टद्वारा बनवण्यात आलेल्या अॅप्स, स्काइप, आउटलुक.कॉम, बिंग सर्च अॅप, यामर आणि XBOX गेम्ससोबत स्नॅपअटॅक, वर्डामेंट तसेच NOKIA स्टोअरमधील काही प्री-इन्स्टॉल्ड अॅप्स देण्यात आल्या आहेत. याशिवाय NOKIA चा नवे नोट बनवता येणारे अॅप OneNote देण्यात आले आहे. हे फीचर पहिल्यांदा NOKIA सोबत येत आहे.
सोशल मीडियाची आवड असणार्‍यांना लाइव्ह, व्ही-चॅट, पाथ, फेसबुक, फेसबुक मॅसेंजर सारख्या अॅप्स प्री- इन्स्टॉल्ड आहेत.

Exit mobile version