मायक्रोसॉफ्टने विंडोज फोन 8.1 अपडेटमध्ये जोडले अनेक फीचर्स

मायक्रोसॉफ्टचं अॅपलच्या सिरी आणि अन्द्रोइडच्या गूगल नाऊला उत्तर म्हणजे cortana डिजिटल असिस्टेंट याची सुरवात चीन आणि यूकेमध्ये Beta व्हर्जनने करण्यात आली होती. आता भारतीय विंडोज फोन मालकांसाठी खुशखबर आली असून Cortana आता भारतात उपलब्ध झाल आहे. मायक्रोसॉफ्टचं विंडोज फोनमध्ये सुधार करण्याचं आणखी एक पाऊल म्हणता येईल …..

सध्या तरी भारतात फक्त लुमिया 630 वरती व ज्या फोनमध्ये डेवलपर बिल्ड आहे त्यांना याचा फायदा उठवता येईल.
हे app चीनमध्ये लोकली Xiao Na ह्या नावाने ओळखले जाते. तिथे mandarin भाषेत बोलल्यास हवामान अपडेट, लोकल टीव्ही शो व सेलेब्रेटीज बद्दल अचूक माहिती मिळते.  तसेच आपण cortana कडून अलार्म, रीमेंडर, ठिकाणे, फोटोज, मूवीज, म्यूजिक, कॉल, इंटरनेट सर्च, मॅप सहाय्य, इत्यादि अनेक कामे करून घेऊ शकतो.
कोर्टाना खरे तर मायक्रोसॉफ्टच्या Halo गेममधील पात्र आहे. भरपूर सुविधांसह हा असिस्टेंट बाकी पर्यायांपेक्षा उजवा ठरतो.

लवकरच सर्व विंडोज फोनवरती उपलब्ध करण्यात येईल त्यावेळी याचा खरा आनंद लुटता येईल.
So , चला बोलूया Hi Cortana !           

Exit mobile version