बारावीचा निकाल आज

राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल आज, सोमवारी जाहीर करण्यात येणार असून, दुपारी एक वाजता हा निकाल मंडळाच्या वेबसाइटवर पाहता येईल. निकालाची मूळ प्रत मंगळवारस १० जून रोजी दुपारी ३ वाजता विद्यार्थ्यांना शाळेत मिळेल. 



निकाल पाहण्यासाठी वेबसाइट 



महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेला मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतून १३ लाख ३७ हजार ११४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यात सात लाख ५९ हजार ८०९ मुले, तर पाच लाख ७७ हजार ३०५ मुलींचा समावेश होता. मुंबई विभागातून तीन लाख २८ हजार ६९८, तर कोकण विभागातून ३३ हजार ७६८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. 


विद्यार्थ्यांना राज्य शिक्षण मंडळाच्या http://www.msbshse.ac.in या वेबसाइटवर त्यांचा निकाल पाहता येईल. या वेळी विद्यार्थ्यांना निकालाचा सर्व सारांश आणि विषयनिहाय गुणही समजणार आहेत. तसेच त्यांना या निकालाची प्रत प्रिंट करून घेता येईल. 

Exit mobile version