रेल्वेचं रिअल टाईम स्टेटस आता तुमच्या मोबाईलवर

रेल्वे वेळेत न पोहचणं , वेळ वाया जाणं आणि त्यामुळं तुम्हाला होणारा मनस्ताप हे नेहमीचंच झालं आहे. पण आता तुमचा हा मनस्ताप कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनानं एक नवीन मोबाईल अॅप आणला आहे. ‘Real Status of Train’ .या अॅपमुळे तुम्हाला तुमच्या ट्रेनचा रिअल टाईम कळणार आहे.  पण त्यासाठी तुमच्याकडे विंडोज 8 वर आधारीत मोबाईल असला पाहिजे.

आता रेल्वे प्रवाशांना विशिष्ट ट्रेनच्या आगमनाची आणि निर्गमनाची माहिती मोबाईल फोनवर मिळणार आहे. तसंच रिअल टाईम बेसिसवर ट्रॅकिंग करता येणार आहे.  रेल्वेच्या सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्ट़िम्सने (सीआरआयएस) हे नवं मोबाईल अॅप्लिकेशन लाँच केलं आहे. या अॅपमुळे ट्रेनच्या वेळे संदर्भात तुम्हाला विविध प्रकारची चौकशी करता  येणार आहे.
सीआरआयएसनं हा मोबाईल अॅप विकसीत केला आहे. तसंच मायक्रोसॉफ्टच्या सहाय्याने विंडोज 8 वर आधारित डेस्कटॉप अॅप्लिकेशन करुन रेल्वे चौकशी प्रणालीत सुधारणा घडवून आणल्या आहेत. नॅशनल ट्रेन इनक्वायरी सिस्टिम ही लोकांना ट्रेनच्या वेळापत्रकासंबंधी माहिती उपलब्ध करुन देणारी बॅकेंड सिस्टिम आहे. या प्रणालीद्वारे लोकांना रिअल टाईम बेसिसवर रेल्वे इनक्वायरी नंबर 139 तसंच संकेतस्थळ (www.trainenquiry.com), मोबाईल इंटरफेस, टच स्क्रीन, इनक्वायरी काऊंटर्स आणि स्टेशनवरील डिस्प्ले बोर्ड द्वारे ट्रेनच्या वेळासंबंधी माहिती उपलब्ध होते. नॅशनल ट्रेन इनक्वायरी सिस्टिमच्या संकेतस्थळाच्या इंटरफेससह त्याचे मोबाईल वर्जन सप्टेंबर 2013 मध्ये लाँच करण्यात आलं आणि ते रेल्वे प्रवाशांना खूपच उपयुक्त असल्याचं सिद्ध झाल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्याचं म्हणणं आहे.
अॅपमधील फिचर्स :
Spot Your Train : आता लाँच करण्यात आलेल्या नव्या मोबाईल अॅपमध्ये ‘स्पॉट यूवर ट्रेन’ या फिचरद्वारे ट्रेनची सद्यस्थिती, आगमनाची अपेक्षित वेळ आणि विशिष्ट स्थानकावरुन निर्गमनाची वेळेची माहिती मिळेल.
Train Between Stations : ‘ट्रेन बिटवीन स्टेशन्स’ द्वारा कोणत्याही दोन रेल्वे स्थानकादरम्यान कोणत्या ट्रेन उपलब्ध आहेत ते कळू शकणार आहे.
Cancelled Trains : या मोबाईल अॅपमध्ये कॅन्सल्ड ट्रेन्सचा पर्याय उपलब्ध आहे त्या द्वारे कॅन्सल करण्यात आलेल्या ट्रेन कळू शकतील. याव्यतिरिक्त दुसऱ्या मार्गावरुन वळवण्यात आलेल्या ट्रेन तसेच वेळापत्रकात करण्यात आलेले बदलही कळू शकणार आहेत.
सध्या विंडोज 8.0 फोनवर हे अॅप लाँच करण्यात आले आहे, तसेच इतर मोबाईल्ससाठी हा अॅप लवकरच विकसीत केला जाणार असल्याचं प्रशासनाच्या वतीनं सागण्यातच आलं आहे.
Exit mobile version