गुगलच अव्वल ब्रँड

अमेरिकेतील इंटरनेट सर्च इंजिन गुगलने मूल्यांकनाच्या बाबतीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रतिस्पर्धी अॅपल या कंपनीला मागे टाकले असून, गुगल आता जगातील सर्वांत अव्वल ब्रँड बनल्याचे ‘मिलवर्ड ब्राऊन’ने जाहीर केले आहे. ‘

मिलवर्ड ब्राऊन’ने २०१४ या वर्षातील पहिले शंभर ब्रँडची यादी प्रसिद्ध केली आहे. त्या अहवालानुसार, गुगलची ब्रँड व्हॅल्यू १५८८४ कोटी डॉलरनी (सुमारे एक लाख कोटी रुपये) वाढली आहे. थोडक्यात एका वर्षात गुगलचे मूल्य सुमारे चाळीस टक्क्यांनी वाढले आहे. या वर्षांत गुगलने गुगल ग्लास विविध भागीदाऱ्या यांमध्ये गुगलने बाजी मारल्याने ही वाढ झाल्याचेही नमूद केले आहे.

टॉप टेन ग्लोबल ब्रँड

गुगल – १५८. ८ बिलियन डॉलर
अॅपल – १४७.९ बिलियन डॉलर
आयबीएम – १०७.५ बिलियन डॉलर
मायक्रोसॉफ्ट – ९०.२ बिलियन डॉलर
मॅकडोनाल्ड – ८५.७ बिलियन डॉलर
कोका-कोला – ८०.७ बिलियन डॉलर
व्हिसा – ७९.२ बिलियन डॉलर
एटी अँड टी – ७७.९ बिलियन डॉलर
मार्लबोरो – ६७.३ बिलियन डॉलर
अॅमॅझॉन – ६३.३ बिलियन डॉलर

ADVERTISEMENT
Exit mobile version