अँड्रॉइडच्या समस्या




अँड्रॉइड स्मार्ट फोन वापरताना मोबाइल युझर्सना सतत मोबाइल हँग होणे, डाऊनलोडिंग संथ गतीने होणे अशा प्रकारांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे अनेकदा मोबाइल वापरताना वैताग येतो. मात्र, यावरील पर्याय अगदी सोपा आहे. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी काही टिप्स…

फ्री स्टोरेज स्पेस


सतत फोनची मेमरी फुल होणे, ही अँड्रॉइड युझर्सना सर्वाधिक भेडसावणारी समस्या. स्मार्ट फोनच्या इंटर्नल मेमरीमधील खूप सारी जागा अॅप्स डाऊनलोड केल्यानंतर त्याला सपोर्ट करणाऱ्या फाइल्स, फोटो व्यापतात. या फाइल्समुळे बऱ्याचदा मोबाइल हँग होणे, अॅप्लिकेशन नीट न चालणे या अडचणी येतात. यावर मायक्रो एसडी कार्डचा वापर, हा एक उत्तम उपाय आहे. याद्वारे इंटर्नल मेमरीमधील अनावश्यक गोष्टी मायक्रो एसडी कार्डमध्ये टाकता येतात. यासाठी AppMgr III हे अॅप अत्यंत उपयोगी आहे.


रॅम फ्री


अॅप सुरू असताना रॅमचा सर्वाधिक वापर होतो. मात्र, अनेकदा दोन जीबीहून अधिक रॅममध्ये कुठलीही अडचण येत नाही. पण, एक जीबी आणि त्यापेक्षा कमी क्षमतेच्या रॅममध्ये अॅप्स इन्स्टॉल करताना मोबाइल संथ गतीने चालणे किवा हँग होण्यासारखे प्रकार होतात. विशेषतः सिस्टीम अॅप्स वापरताना ही अडचण प्रामुख्याने जाणवते. मात्र, सिस्टीम अॅप्स डिव्हाइसवर असणे अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे अशावेळी रॅममध्ये स्पेस फ्री असणे गरजेचे असते. यासाठी ‘क्लिन मास्टर’ नावाचे अॅप उपलब्ध असून यामुळे तुमचा अँड्रॉइड फोन योग्य स्थितीत राहू शकतो. ‘क्लिन मास्टर’ इंटर्नल मेमरी नियंत्रणात ठेवण्यातही मदत करते. त्याचबरोबत यात असलेल्या अॅप अनइन्स्टॉलरने मोबाइलमधील टेंपररी फाइल्स बाहेर काढण्यास मदत होते.


परफॉर्मन्स वाढविण्यासाठी


हँडसेट थोडा जुना झाल्यानंतर तो वापरताना अनेक अडचणी येतात. अॅप्स कार्यरत होताना वेळ लागणे, व्हिडिओ, मोबाइल स्लो चालणे यासारख्या बाबींमुळे हँडसेट वापरताना प्रचंड मनस्ताप होतो. या अडचणी टाळण्यासाठी काही उपाय करता येऊ शकतात. आपण हँडसेट सुरू केल्यानंतर नकळत अनेक अॅप्स आणि विजेट्स कार्यरत असतात. ते बॅकग्राऊंडमध्ये सुरू असले तरी त्यात मेमरी मोठ्या प्रमाणात कन्झ्युम होते. आपल्या उपयोगाची नसलेली अॅप्स आणि विजेट्स ‌डिलीट केल्यास मोबाइल युजर्सला अॅण्ड्रॉइड वापरताना चांगले रिझल्टस मिळतात. त्याचबरोबर अनेक फॅन्सी मेन्यू अॅनिमेशन इफ्केटही बंद करून अॅड्रॉइडची कार्यक्षमता वाढवू शकतात.

अॅंटीवायरस वापरा : 
360 security हा झकास अॅंटीवायरस असून तो मेमोरी बद्दलही काम करतो तसेच एसएमएस लॉक app लॉक सारखे features सुद्धा देतो  

Exit mobile version