एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार कंपनीने काही ठिकाणी ‘वाय-फाय’ची चाचणी देखील सुरु केली आहे. जिथे सर्वाधिक इंटरनेटचा वापर होत आहे त्याठिकाणी प्राधान्याने वाय-फाय सुरु करण्याचा निर्धार वोडाफोन व्यक्त केला आहे.
वोडाफोनच्या ग्राहकांना ही सुविधा मोफत मिळणार आहे. यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारचे युजर नेम आणि पासवर्ड द्यावं लागणार नाही. कंपनीने मुंबई सारख्या महानगरांमध्ये यावर काम देखील सुरु केलं आहे. हा प्रोजेक्ट ‘स्प्रिंग प्रोजेक्ट’ म्हणून ओळखला जाणार आहे.
वाय-फाय जेथे-जेथे असणार आहे त्या ठिकाणांची खासियत म्हणजे तेथे इंटरनेटचा स्पीड फारच जास्त असणार आहे. याविषयी कंपनीच्या आर्थिक बाबीही लक्षात घेत आहे.