राकूटेन कंपनीने 5580 कोटीत विकत घेतले व्हाइबर स्मार्टफोन अ‍ॅप

राकूटेन कंपनीने 5580 कोटीत विकत घेतले व्हाइबर स्मार्टफोन अ‍ॅप
Viber Messaging App Logo
जपानी कंपनी राकूटेने लोकप्रिय व्हाइस आणि मॅसेजिंग अ‍ॅप व्हाइबर  5580 कोटी रूपयांत विकत घेतले आहे. भारतासोबतच अनेक देशात व्हाइबरची वाढणारी बाजारपेठ पाहून कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

*इंग्लिश, चायनिज, जर्मन, फ्रेंच, कोरियन, आणि रशियन आशा ऐकूण 30 भाषांमध्ये व्हाइबर उपलब्ध आहे. राकुटेv लवकरच हे अ‍ॅप हिंदीमध्ये लॉन्च करणार आहे.
*व्हाइबरचे 20 कोटी युजर्स आहेत. या कंपनाचे सीईओ  टेलमॉन मार्को हे होते.

सर्वात लोकप्रिय व्हइबर आउट सेवा व्हाइबर मिडियाचे व्हाइबर आउट हे सर्वात लोकप्रिय अ‍ॅपलिकेशन आहे. याच्या मदतीने दूस-या मोबाइल नंबरवर किंवा लॉण्डलाइन नंबरवर कॉल करता येतो. ही सेवा फिलिपाईनमध्ये आलेल्या वादळ्यात आडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी तयार करण्यात आली होती. मोअर टॅबवर क्लिक करून युजर व्हाइबरचा पर्याय निवडू शकतात.

इतिहास
सर्वात अधी 2 डिसेंबर 2010 मध्ये व्हाइबर कोवळ Apple युजर्साठी लॉन्च करण्यात आले होते. स्काइपला टक्कर देण्यासठी हे अ‍ॅप लॉन्च करण्यात आले होते. मे 2011 मध्ये हे अ‍ॅप अ‍ॅन्ड्राइड युजर्साठी लॉन्च करण्यात आले तर 19 जुलैपासून हे अ‍ॅप प्रत्येक स्फॉटवेअरसाठी उपलब्ध करून देण्यात आले. 24 जुलै 2012 पर्यंत व्हइबरचे 9 कोटी युजर्स तयार झाले होते.

काय आहे व्हाइबर  ?
हे एक क्रॉस प्लॅटफॉर्म इंस्टेंट व्हाइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल अ‍ॅपलिकेशन आहे. हे अ‍ॅप स्मार्टफोन साठी तयार करण्यात आले आहे. स्मार्टफोन युजर कम्युनिटी याच्या मदतीने टेक्स मॅसेजसोबतच फोटो, व्हिडीओ आणि एक्सचेंज करू शकते. अ‍ॅन्ड्राइड,ब्लॅकबेरी, आईओएस सिरिज40, सिंबिंयन, विंडोज आणि मायक्रोसॉफ्ट अशा सर्वच ऑपरेटिंग सिस्टमवर व्हाइब सॉफ्टवेअर काम करते. 

Exit mobile version