या अपडेटमध्ये नव्या फोन डायलर अॅप्लिकेशन तसंच गुगल हँगआऊटशी एसएमएस आणि एमएसएस क्षमता संलग्न होऊ शकणार आहेत. या अपडेटमुळं गॅलरी अॅपमध्ये नव्या फोटो एडिटिंग ऑप्शनची भर पडणार आहे. त्यात नव्या फिल्टर इफेक्ट, फोटो काढण्याची क्षमता, अॅडव्हान्स्ड क्रॉपिंग, तसेच कलर, एक्सपोझर, काँट्रास्टमध्ये सहज बदल करता येणार आहेत.
या व्यतिरिक्त फोटो छापणे, गुगल डॉक्स, जीमेल मेसेज यासाठी हे अॅप सहाय्यभूत ठरेल. तसेच वायफाय, ब्ल्युटूथ आणि गुगल क्लाऊड प्रिंट, एचपी इ प्रिंटरचा उपयोगही सहज करता येणार आहे. मोटो जीचा वापर करणाऱ्या नोटिफिकेशन येणार नाही. त्यांना सेटिंगमधून हे अॅप चेक करता येईल.
सेटिंग आयकॉनवर टॅप केल्यानंतर अबाऊट फोनवर तसेच सिस्टिम अपडेटवर टॅप करावे. त्यानंतर डाऊनलोड सिलेक्ट करुन अपडेट करावे. मागच्या आठवड्यात लाँच करण्यात आलेल्या मोटो जीची फक्त फ्लिपकार्टच्या माध्यमातून विक्री करण्यात येते आहे. या मॉडेलमध्ये 720 रेझोल्यूशनसह 4.5 इंच स्क्रीन आहे.
त्याचप्रमाणे स्नॅपड्रॅगन 400 क्वॉड प्रोसेसरमुळं 1.2 GHZ स्पीड आहे. यात 8 GB आणि 16 GB स्टोरेज क्षमतेचे पर्याय आणि 16 GB रॅम आहे. प्रायमरी कॅमेरा 5 MP तर सेंकडरी कॅमेरा 1.3 MP इमेज शूट करु शकतो.
त्यामुळं आता अँड्रॉईड 4.4.2 किटकॅट फिचरमुळे मोटी जीला किती फायदा होतो आणि आधीच भरघोस विक्री होत असतांना आणखी किती मागणी वाढते हे लवकरच करणार आहे.