या अॅपमुळे वापरकर्ता सध्या कोठे आहे, याची माहिती मिळू शकते. त्यासाठी मायक्रोसॉफ्ट अझुअर क्लाउड सर्व्हिस आणि बिंग मॅप एपीआय यांची मदत घेण्यात आली आहे. अडचणीच्या वेळी महिला फक्त एक बटण दाबून आपले मित्र, कुटुंबीय, पोलिस, हॉस्पिटल यांना मदतीसाठी बोलावू शकतील.
‘हे अॅप भारतातील कर्मचाऱ्यांनी सहा महिन्यांच्या कालावधीत मायक्रोसॉफ्ट गॅरेजमध्ये विकसित केले आहे. मायक्रोसॉफ्ट गॅरेज ही ग्लोबल यंत्रणा असून, तेथे जगभरातील कर्मचाऱ्यांना फावल्या वेळात अभिनव कल्पना मांडण्याची संधी मिळते,’ असेही बियानी यांनी सांगितले.
गार्डियन काम कसे करते?
विंडोज फोनमध्ये हे अॅप डाउनलोड करायचे.
त्यानंतर त्याच्या सेटिंगमध्ये मित्र, पालक आणि सुरक्षा यंत्रणांचे मोबाइल नंबर, ई-मेल आयडी, खासगी फेसबुक ग्रुप अॅड करायचे.
मोबाइलमध्ये ‘एसओएस’ संदेश पाठविण्यासाठी एक विशिष्ट बटन निश्चित करायचे.
अडचणीच्या वेळी हे बटन दाबताच मित्र, पालक, सुरक्षा यंत्रणा यांना एसएमएस जातो. त्याचबरोबर संदेश पाठविणारी व्यक्ती कोठे आहे, ते ठिकाणही समजते.
अपघातात फोन तुटला असेल तरीही हे अॅप काम करते.
यामध्ये वन टच व्हिडिओ रेकॉर्डिंगचीही सोय आहे. यामधून केलेले व्हिडिओ रेकॉर्डिंग पुढे पुरावा म्हणून वापरले जाऊ शकते.
महिलांना सुरक्षा पुरवणारी आणखी काही अॅप –
सेफ्टीपिन – अँड्रॉइड आणि आयफोनवर चालते. मोफत उपलब्ध. दिल्लीतील कंपनीकडून विकसित
आय एम सेफ – फरीदाबाद पोलिसांकडून विकसित
हेल्प मी ऑनमोबाइल – बेंगळुरू येथील ऑनमोबाइल कंपनीकडून विकसित