मायक्रोमॅक्स या भारतीय कंपनीने या टॅबलेटचे लाँचिंग करीत जागतिक बाजारपेठेत प्रवेश केला. एकाच वेळी टॅबलेट आणि लॅपटॉप असा याचा वापर करता येईल. सिस्टिम सुरु होताच टॅबलेट तुम्हांला विचारणा करेल की, तुम्हांला विंडोजवर काम करायचं आहे की, अँड्रॉइडवर. युझर्सना आपल्या सुविधेनुसार ऑपरेटींग सिस्टिम निवडता येणार आहे.
मायक्रोमॅक्स ड्यूल ओएस लॅपटॅबची वैशिष्ट्ये
> मायक्रोमॅक्स लॅपटॅब दोन ऑपरेटींग सिस्टिम (विंडोज ८ / अँड्रॉइड जेली बीन)
> टॅबलेटमध्ये १.४६ GHz इंटेल प्रोसेसर > १०.१ इंचीचा आयपीएस डिस्प्ले स्क्रिन
> २ जीबी रॅम > ७४००mAh बॅटरी क्षमता > २ मेगापिक्सल कॅमेरा > वायरलेस की-बोर्ड
> ३२ जीबी इंटरनल मेमरी टॅबलेट मेमरी ६४ जीबी पर्यंत वाढवता येईल.
> ड्यूल ओएस लॅपटॅबची किंमत – १९,९९० रु.