व्यक्तीगत ऑनलाईन ब्रँडिंगसाठी ही नवी डॉमेन नेम उपयुक्त ठरणार आहेत. डॉट.कॉम यापेक्षा हटके डॉमेन नेम रजिस्टर करता येणार असेल तर आपलं वेगळेपण अधोरेखित करण्यासाठी काही जण त्याला नक्कीत मोठ्या प्रमाणावर पसंती देतील. त्यामुळे आता डॉट.कॉम या डोमेन अँड्रेसला स्पर्धा निर्माण होणार आहे.
इंटरनेटवर आपल्या वेबसाईटसाठी .guru, .bike, .singles, .plumbing आणि and .clothing यासारखी निवडक वेब अॅड्रेसची नोंदणी करता येणार आहे. डोनटस् इनकॉर्पोरेशननं सात नवीन इंटरनेट डोमेन नेम उपलब्ध करुन दिले आहेत.
यामुळे इंटरनेट डोमेन नेमसाठी याआधीच्या तुलनेत निवडीसाठी अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ऑनलाईनवर तुम्हाला स्वत:ची ओळख आणि ब्रँडचे वेगळेपण अधोरेखित करता येणार आहे. जगभरातल्या अधिकृत नोंदणीकृत असलेल्यांसाठी ‘फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हड’ तत्वावर या डोमेन नेमची नोंदणी करता येणार आहे.
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार 5 फेब्रुवारीपासून .camera, .equipment, .estate, .gallery, .graphics, .lighting आणि .photography अशा काही नवीन टॉप लेव्हल डोमेन नेमचा पर्याय केले जाणार आहेत.
आपली ऑनलाईन आयडेंटिटी (ओळख) निर्माण करण्यात ज्यांना स्वारस्य असेल त्यांच्यासाठी हा नाविन्यपूर्ण अनोखा पर्याय उपलब्ध होणार आहे. यामाध्यमातून इंटरनेट डोमेन नेमच्या रजिस्ट्रेशनच्या इतिहासात एक नवीन युग अवतरणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.