इंटरनेटचा वापर ज्या प्रमाणात वाढतो आहे त्या प्रमाणात त्यासाठीचे पर्यायही वाढू लागले आहेत. यामुळे सध्या मार्केटमध्ये वायर, वायरलेस, वाय-फाय असे विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. यात पुन्हा वायरलेसला आणखी चांगली मागणी आहे. म्हणूनच इंटरनेट सुविधा पुरविणाऱ्या डोंगल कंपन्यांमध्ये तुंबळ युद्ध रंगले आहे.इंटरनेटचा वापर करायचं म्हटलं की सध्या विविध पर्याय आपल्यासमोर उपलब्ध असतात. यामुळे लोकांना नेमका कोणता पर्याय स्वीकारायचा, हा प्रश्न पडत असतो. विविध पर्यायांचा आपण तुलनात्मक अभ्यास करू या आणि सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या थ्रीजी डोंगलविषयी जाणून घेऊ या.ब्रॉडबँडसर्वात उत्तम आणि अखंडित सेवा म्हणून ब्रॉडबँडचा पर्याय उत्तम असतो. यामध्ये आपल्याला बीएसएनएल, एमटीएनएल यांसारख्या सरकारी कंपन्या याचबरोबर हाथवेसारख्या खाजगी कंपन्या आपल्याला ही सुविधा देत असतात. यामध्ये आपल्याला तासन्तास अखंडित सेवा मिळते. याचबरोबर आपल्याला या सेवेमध्ये वेगही चांगला मिळतो. म्हणूनच बहुतांश लोक ब्रॉडबँडला अधिक पसंती देतात. यातील अडचणी म्हणजे यामध्ये आपल्याला घरात वायर्सचा पसारा सांभाळावा लागतो. तसेच ज्या टिकाणी मोडेमच्या साह्याने जोडणी केली आहे त्या ठिकाणीच बसून आपल्याला काम करावे लागते. म्हणून ज्यांच्याकडे डेस्कटॉप आहे आणि ज्यांना फार प्रवास करावयाचा नसतो अशा ठिकाणीच ही सुविधा उपयोगी पडू शकते.डोंगलफिरते इंटरनेट म्हणून ज्याची ओळख आहे असे हे डोंगल. ज्याचा वापर आपण घरात बसून किंवा अगदी चालत्या लोकलगाडीमध्येही करू शकतो. यामुळे सध्या डोंगलला खूप मागणी आहे. ही मागणी लक्षात घेता बहुतांश कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू झाल्यात आणि डोंगल आपल्याला अगदी स्वस्तात उपलब्ध होऊ लागले. पण डोंगल घेतल्यावर त्याद्वारे इंटरनेट वापरण्यासाठी येणारा खर्च हा इतर पर्यायांच्या तुलनेत जास्त आहे. याचबरोबर डोंगलमध्ये आणखी एक अडचण असते. म्हणजे आपल्याला जर आपण ज्या ठिकाणी आहोत तिथे रेंज मिळाली नाही तर इंटरनेटचा वापर करता येत नाही. यामुळे डोंगल घेण्यापूर्वी आपण ज्या ठिकाणी त्याचा सर्वाधिक वापर करणार आहोत त्या ठिकाणी डोंगल घेऊन जावे आणि त्या ठिकाणी रेंज मिळते आहे का ते पाहावे. तसे झाले तरच डोंगल खरेदी करण्यात शहाणपण ठरेल.वाय-फायवायरलेस इंटनेटमधील सर्वात जास्त मागणी असलेली सुविधा म्हणजे वाय-फाय यामध्ये आपल्याला अमुक एका परिसरात इंटरनेटचा वापर करण्याची मुभा मिळते. यामुळेच वाय-फाय हे सध्याचे सर्वाधिक मागणीचे इंटरनेट माध्यम आहे. या सुविधेमध्ये आपण एकदा आपल्या राऊटरला डिवाइस जोडला की इंटरनेट सुरू होते. ज्यांच्या घरात तीन ते चार स्मार्टफोन आहेत याचबरोबर संगणक आहेत अशा लोकांना डेटा कार्डचे पसे वाचविण्यासाठी हा पर्याय एकदम चांगला असतो. याला वेगाची मर्यादा असली तरी आपण एकाच वेळी ते अनेक उपकरणांवर वापरू शकतो. यामध्ये आणखी एक त्रुटी म्हणजे आपण वायफायचा वापर अमुक एका परिसरापुरताच करू शकतो. इतकेच नव्हे तर यामध्ये सुरक्षा प्रश्नही असतात.बाजारात उपलब्ध असलेले डोंगलमोबाइल सेवा देणाऱ्या सर्व कंपन्यांचे डोंगल बाजारात उपलब्ध आहेत. यामुळे त्यांची स्पर्धा तगडी आहे. यामध्ये आयडिया, एअरटेल, व्होडाफोन, रिलायन्स, टाटा या कंपन्या आघाडीवर आहेत. याशिवाय ज्या कंपन्या मोबाइल सेवेत नाहीत अशा एमटीएस यांसारख्या कंपन्याही या सेवेत आहेत. या कंपन्यांचे डोंगल आपल्याला तुलनेत स्वस्तात उपलब्ध होतात. सध्या थ्रीजी डोंगल बाजारात उपलब्ध असून स्पध्रेमुळे आपल्याला हे डोंगल अगदी स्वस्तात उपलब्ध होतात. पण याचे विविध प्लान्स आपल्याला चांगलेच महागात पडतात. पण जे लोक सातत्याने प्रवास करीत असतात अशा लोकांना हे डोंगल खूप उपयुक्त ठरतात. याशिवाय डोंगलमध्ये तुम्हाला डाटा सेव्ह करून ठेवण्याची सुविधाही असते. यामुळे याचा वापर तुम्ही पेन ड्राइव्हसारखाही करू शकता. आता गुगलसारख्या बडय़ा कंपन्याही डोंगलची निर्मिती करू लागल्या आहेत. गुगलने मध्यंतरी क्रोमकास्ट हे व्हिडीओ डोंगल सादर केले. टीव्हीला कनेक्ट करून या डोंगलच्या आधारे युटय़ूब आणि इतर साइट्सवरील व्हिडीओ पाहता येणार आहेत. सध्या अमेरिकेत हे डिव्हाइस उपलब्ध असले तरी लवकरच त्याचे भारतातही आगमन होणार आहे. सध्या या उपकरणाची किंमत ३५ डॉलर ठरविण्यात आली आहे. अॅपल टीव्हीसाठी सेट टॉप बॉक्स घ्यायचा असेल तर १०० डॉलर मोजावे लागतात. तर वेबबेस्ड अॅप्लिकेशन चालविण्यासाठी आवश्यक टीव्हीची किंमत १ हजार डॉलर आहे.
त्या तुलनेत क्रोमकास्ट स्वस्तच म्हणावा लागेल. अॅपल टीव्ही वगरे इंटरनेटला कनेक्ट होणारे असले, तरी त्यांना सोबत घेऊन फिरणे शक्य नाही. क्रोमकास्ट हे केवळ डोंगल असल्याने सोबत कुठेही नेऊन वापरता येते. टीव्हीला जोडा, वायफाय कनेक्ट करा आणि सुरू करा त्याचा वापर, इतके ते सोपे आहे. क्रोमकास्ट युटय़ूब, नेटफ्लिक्स आणि गुगल प्लेसारख्या अॅप्लिकेशनला ते सपोर्ट करते. पसे मोजले तर अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि एचबीओ गोदेखील यावर पाहता येतात. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या गोष्टी सुलभ होतात.
आयफोन, आयपॅड, अँड्रॉइड मोबाइल किंवा टॅब क्रोमकास्टच्या साहाय्याने थेट टीव्हीशी जोडता येतो. त्यामुळे तुमच्या मोबाइल, टॅबमधील व्हिडीओ थेट टीव्हीवर पाहता येतात. यासाठी कुठल्याही विशेष रिमोटची गरज पडत नाही. क्रोमकास्ट घेतल्यावर सेट टॉप बॉक्स, इंटरनेट डोंगल यांसारख्या इतर कुठल्याही उपकरणाची गरज पडत नाही. केवळ क्रोमकास्टच्या आधारे व्हिडीओ आणि ऑडिओ टीव्हीवर थेट पाहता येतात.