टॅब्लेट आणि स्मार्टफोन युर्जससाठी ग्रँड थेफ्ट ऑटोसारखी दुसरी वस्तू नाही. त्यामुळे सोनी आणि मायक्रोसॉफ्ट अशा युर्जसना आकर्षित करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. तंत्रज्ञान जगतातील दोन मोठे मल्ल पुढच्या दशकात होणार्या चढाओढीत पूर्णांशाने अंग टाकणार आहेत. एकीकडे सोनीचे 25000 रुपयांचे प्ले स्टेशन 4 आहे. दुसरीकडे, मायक्रोसॉफ्टचे 31250 रुपयांचे एक्स बॉक्स वन आहे. हे डेस्कटॉपसारखे मल्टिमीडिया डिव्हाइस आहे. यात टीव्ही, स्ट्रीमिंग सर्व्हिस आणि गेमिंगला व्हाइस मास्टर हबने जोडले आहे.
दोन्ही कन्सोल एकसारखी मीडिया सर्व्हिस ऑफर करीत आहेत. तसा त्यांच्या किमतीत 6250 रुपयांचा फरक खूपच वाटतो.
असे आहेत दोन्ही गेम कन्सोल
प्ले स्टेशन 4: किंमत रू 25000
मायक्रोसॉफ्टच्या कायनेक्टच्या तुलनेत प्ले स्टेशनच्या कॅमेर्याचा व्हाइस कंट्रोल सरळ आहे. याची किंमत वेगळी 3750 आहे. ब्ल्यू रे प्लेअर आणि कन्टेंट स्ट्रीमिंग सर्व्हिस. वायरलेस गेम पॅड. बहुतांश ऑनलाइन सेवांसाठी 3120 रुपये वार्षिक शुल्कचे सदस्यत्व अनिवार्य आहे.
एक्स बॉक्स वन : किंमत रु. 31250
कायनेक्ट कॅमेरा आणि मायक्रोफोन सेन्सर. केबल बॉक्सने लाइव्ह टीव्ही, ब्ल्यू रे प्लेअर आणि स्ट्रीमिंग सर्व्हिस, नवीन वायरलेस गेम पॅड.
ऑनलाइन सेवांसाठी 3750 रुपये वार्षिक शुल्कचे एक्स बॉक्स लाइव्ह गोल्ड सदस्यत्व.