..
* स्नॅपसीड (आयओएस , अँड्रॉइड) Snapseed
‘ स्नॅपसीड ‘ हे ऑल इन वन अॅप आहे. अगदी बेसिक एडिटिंग म्हणजे कलर , क्रॉप , फिल्टरपासून ते फोटोला बॉर्डर देण्यापर्यंत सगळी कामे या अॅपच्या मदतीने आपण करू शकतो. या सर्व वैशिष्ट्यांमुळे आणि आकर्षक आणि सोप्या यूजर इंटरफेसमुळे हे अॅप तुमच्या मोबाइलमध्ये हवेच. याची साइझ २४ एमबी असली , तरी यात दिल्या गेलेल्या सुविधांमुळे हे अॅप नक्की वापरून बघायला हवे.
* कॅमेरा ३६० (अँड्रॉइड) Camera 360
८ शूटिंग मोड्स , पोर्ट्रेट फोटोसाठी इन लाइट नावाचे नवीन फीचर आणि विविध फिल्टर्स या सगळ्यामुळे ‘कॅमेरा ३६० ‘ हे अॅप इतरांपेक्षा निश्चितच वेगळे आहे. इझी शेअर ऑप्शनच्या मदतीने आपण एडिट केलेले फोटो लगेच फेसबुक , ट्विटरवर टाकू शकतो. हे अॅप १५ एमबी साइझचे असून सध्या गुगल प्ले स्टोअरवर सर्वाधिक लोकप्रिय अॅप्सपैकी आहे.
* पिक से (आयओएस , अँड्रॉइड) Picsay
अवघी १.२ एमबी साइझ असलेल्या या अॅपमध्ये फिल्टरसारखे फीचर्स नसले , तरी स्टीकर या वैशिष्ट्यामुळे हे अॅप बाकी अॅप्सपेक्षा नक्कीच उजवे आहे. या स्टीकरच्या मदतीने आपण हवा तो मजकूर फोटोवर टाकू शकतो. वेगवेगळे आकार , चिन्हेदेखील आपण आपल्या फोटोत टाकू शकतो. या अॅपच्या सहाय्याने बेसिक इफेक्ट्स असोत किंवा स्पॉटलाइट इफेक्ट अगदी सहज फोटोवर वापरता येऊ शकतात.
PicsArt, Cymera, Photo Editor by Aviary, PhotoStudio, Pho.to, Adobe Photoshop, Pixlr Express, Fxcamera, Camera FX, Line Camera , etc are also best apps for editing or capturing photos……..
………………
* मोबाइल फोटोग्राफी टिप्स
फक्त या टिप्स वापरा आणि तुम्हीसुद्धा बना ‘ प्रो ‘
>> तुमच्या कॅमेरा अॅप्समध्ये असलेल्या बर्स्ट मोडच्या मदतीने जास्तीत जास्त फोटो घ्या. तुमच्या कॅमेरा अॅपमध्ये हा मोड नसेल , तर वर दिलेल्या स्नॅपसीड/कॅमेरा ३६० मधील बर्स्ट मोड वापरून सलग १०-१५ फोटो घ्या. तुम्हाला आवडत असलेला फोटो ठेवा आणि बाकीचे उडवून टाका.
>> फोटोमध्ये लाइट इफेक्ट किंबहुना लाइट खूप महत्त्वाची ठरते. उपलब्ध लाइटचा पुरेपूर उपयोग करा. आवश्यकता असेल तिथेच फ्लॅश वापरा.
>> तुमच्या कॅमेरा अॅप्समध्ये दिले गेलेले फीचर्स , फिल्टर्स एक-एक करून नक्की हाताळून बघा. त्यामधील सेटिंग जाणीवपूर्वक बदलून फोटो काढून बघा. कदाचित एखादा चांगला फोटो नव्या इफेक्टसह तुम्हाला मिळेल.
>> आताच्या बहुतेक सर्व मोबाइलमध्ये ‘ टॅप टू फोकस ‘ हे फीचर्स असते. तुमचा मोबाइल कॅमेरा फोकस करायला वेळ घेत असेल , तर तुम्ही तुमच्या मोबाइल स्क्रीनवर तुम्हाला फोकस हवे असलेल्या ठिकाणी टॅप करून जलद फोकस करू शकता.
Fun Apps:
* ट्रोल फेसेस प्रो
प्रो या नावावर नका जाऊ , हे धम्माल अप्लिकेशन प्ले स्टोअरमध्ये मोफत उपलब्ध आहे. याची साइज फक्त ३.३ एमबी आहे. याच्या मदतीने फोटोमध्ये चेहऱ्यावर विविध ट्रोल फेसचे स्टीकर लावता येतात. फॉरेव्हर अलोनसारखे अनेक स्टिकर्स उपलब्ध असून यात तयार केलेले फोटो व्हॉटस्अप , ईमेलद्वारे थेट शेअर करता येतात.
* जीएटीएम मेमे जनरेटर
जनरेट ऑल द मेमेस असे याचे खरा नाव. हे अॅप्लिकेशनही प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे. ७.५ एमबीच्या या अॅप्सच्या मदतीने तुम्ही १०० हून अधिक मेमे बनवू शकता. निवडलेल्या फोटोंवर तुम्हाला कोट्सही टाकता येतात. यात तयार केलेल्या इमेजसही व्हॉट्स अॅप , ईमेलवर शेअर करता येतात.
* फेस स्वॅप
या अॅप्लिकेशनची साइझ २.३ एमबी आहे. या अॅप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही फोटोमधील दोन चेहेरे एकमेकांसोबत बदलू शकता. याची एक खासियत म्हणजे यामध्ये ऑटोमॅटिक फेस डिटेक्ट होतात आणि नाही झाले तर आपण स्वतः ते करू शकतो. असे फोटो बनवायला आणि बघायलाही फारच मजा येते.
– अक्षय पेंडभाजे
– जयंत चौगुले