‘आरकॉम’ अर्थात ‘रिलायन्स’ने भारतात iPhone कॉन्ट्रॅक्टवर देण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेत iPhone कॉन्ट्रॅक्टवर मिळतो. अगदी याच धरतीवर भारतातही iPhone मिळणार आहे. ही योजना iPhone 5C आणि iPhone 5S हे दोन मॉडेल्सवरच असल्याचेही रिलायन्सने जाहीर केले आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणतंही डाऊन पेमेंटही आकारले जाणार नाही.
भारतात आजपासून (एक नोव्हेंबर) आयफोनची विक्री सुरू झाली आहे. लेटेस्ट आयफोन विकत घेण्यासाठी भारतात iPhone 5C साठी रू. 42000 आणि iPhone 5S साठी रू. 54000 मोजावे लागणार आहेत. मात्र ही किंमत कॉन्ट्रॅक्ट फ्री असणार आहे. आता रिलायन्सने ईएमआय आधारित दोन वर्षांच्या कॉन्ट्रॅक्टची घोषणा केल्यामुळे भारतात आयफोनची विक्री वाढण्यास मदत होणार आहे.
रिलायन्स’ने जाहीर केल्यानुसार, iPhone 5C फोन विकत घेण्यासाठी 24 महिन्यांच्या मुदतीत प्रत्येक महिन्याला 2499 रुपये EMI भरावा लागेल.
iPhone 5S साठी 24 महिन्यांच्या मुदतीत 2999 रुपये EMI भरावा लागेल.रिलायन्सच्या या स्कीमसोबत प्रत्येक आयफोन धारकाला मोफत अनलिमिटेड एसएमएस आणि फोन कॉल (लोकल आणि नॅशनल), तसेच 3G डाटा यूजेस आणि त्यासोबतच या स्कीममध्ये नॅशनल रोमिंग फ्री मिळणार आहे.
या स्कीमला थक्क करणारा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा असल्याचा दावाही त्यांनी केला.आता भारतात 16GB iPhone 5 हा 45 हजार रूपयांपर्यंत मिळतो. तर 64GB चा iPhone 5 हा 59 हजार रूपयांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे भारतीय ग्राहक कशाला पसंती देतील, ते लवकरच स्पष्ट होईल.भारतातील मोबाईल सेवा पुरवणार्या किंवा हँडसेट विक्री करणार्या कंपन्या या कॉन्ट्रॅक्ट आणि लॉक्ड सिस्टीमचा वापर करत नाहीत. त्यामुळे तुम्हाला फोनची पूर्ण किंमत एक रकमी भरावी लागते. यामुळे पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतात मोबाईलच्या किंमती जास्त वाटतात.भारतात विक्रीसाठी उपलब्ध असलेले iPhone 5C आणि iPhone 5S हे अनलॉक्ड आणि कॉन्ट्रॅक्ट फ्री आयफोन आहेत. अमेरिका किंवा युरोपात लॉक्ड आणि कॉन्ट्रॅक्टचे आयफोन मिळतात.
iphone-available-on-emi-in-india-contract-of-two-years