सध्या सणासुदीचा हंगाम सुरु झाला आहे. दस-यानंतर आता दिवाळीच्या खरेदीची बाजारात धूम आहे. तरुणाईला साद घालतात ते गॅजेट्स. हंगाम पाहून अनेक बड्या कंपन्यांनी स्मार्टफोन्स आणि इतर गॅजेट्सच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घट केली आहे. ग्राहकांसाठी अनेक आकर्षक ऑफर्सही उपलब्ध आहेत. कॅमेरा, स्मार्टफोन्स, टीव्ही, टॅब्लेट, लॅपटॉप इत्यादी वस्तुंची विक्री मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे अनेक उत्पादनांच्या किंमती घटविण्यात आल्या आहेत.
अनेक ऑनलाईन स्टोर्समध्ये ऑफर्स देण्यात येत आहेत. फ्लिपकार्ट डॉट कॉम www.flipkart.com या आघाडीच्या वेबसाईटवर दिवाळी सायबर सेल सुरु आहे. या सेलमध्ये लॅपटॉप, स्मार्टफोन्स आणि इतर अनेक वस्तुंवर 20 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत आहे. घड्याळांवर 20 ते 25 टक्क्यांची सूट आहे. याशिवाय ‘डिल ऑफ द डे’ या नावाने दररोज एक स्पेशल ऑफर दिली जात आहे. याअंतर्गत एका विशिष्ट वस्तूवर 50 टक्के सूट दिली जाते.
e.g. Nokia Lumia 920 now at Rs.21500 (Regular price Rs31200)!!!!!!!
ऑनलाईन शॉपिंग साईट स्नॅपडीलनेदेखील दिवाळीसाठी खास ऑफर्स आणल्या आहेत. मोबाईल फोन, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर ही ऑफर आहे. स्नॅपडीलवर www.snapdeal.com गुगल नेक्सस 4 या स्मार्टफोनची किंमत घटविण्यात आली आहे. हा फोन आत 22499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तसेच या साईटवर 40 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत आहे.
ब्लॅकबेरीनेही 3 महागड्या स्मार्टफोन्सच्या किंमती घटविल्या आहेत. ही सूट मर्यादीत कालावधीसाठी आहे. कंपनीने क्यू10, झेड10 आणि क्यू5 या फोन्सच्या किंमतीत घट केली आहे. त्यानुसार, झेड10 आता 29 हजार रुपयांमध्ये, क्यू10 39990 रुपये आणि क्यू5 आता 22699 रुपयांमध्ये मिळेल. फ्लिपकार्टवर ब्लॅकबेरी झेड10 27500 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. कंपनी ऑफरपेक्षाही ही किंमत 1500 रुपयांनी कमी आहे.
नोकियानेही ल्युमिया श्रृंखलेतील स्मार्टफोन्ससाठी एक्स्चेंज ऑफर दिली आहे. जुना चालू स्थितीतील हॅण्डसेट देऊन ल्युमिया श्रृंखलेतील 925, 625, 620 आणि 520 यापैकी एक हॅण्डसेट विकत घेता येईल. त्यासाठी 4 हजार ते 10 हजार रुपयांपर्यंत सूट मिळेल.
शॉपक्ल्यूस (Shopclues.com) या ऑनलाईन शॉपिंग साईटनेही इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर सूट जाहीर केली आहे. मोबाईल फोन्सवर 33 टक्क्यांपर्यंत आणि इतर ऍक्सेसरीजवर 51 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत आहे. याशिवाय अनेक उत्पादनांवर 1500 ते 2000 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे.
ऍमेझॉन इंडियानेही (amazon.in)अनेक गॅजेट्सवर दिवाळी ऑफर दिली आहे. ऍमेझॉन किंडल 6 इंचाच्या इबुक रिडरची किंमत 5999 रुपये आहे. या साईटवर मोबाईल फोन्स, टॅब्लेट, कॅमेरा आणि विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंवर सूट देण्यात येत आहे.
incoming search terms : Special diwali online sale offers on smartphones android windows laptops mobiles htc sony apple blackberry tablets ipads etc