अनुभव चांगला मिळावा , या हेतूने गुगल अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमची नवी व्हर्जन लाँच करीत असते .
सध्या जेली बीन ऑपरेटिंग सिस्टिमची सीरिज सुरू असली , तरी पूर्णपणे नवी अँड्रॉइड किटकॅट ऑपरेटिंग
बाजारात येण्याची चर्चा आहे . कम्प्युटिंगच्या याबदललेल्या बाजारपेठेत उशिरा का होईना मायक्रोसॉफ्ट
कंपनीने उडी मारली आहे . टच टेक्नॉलॉजिला पूरक ठरले, अशी विंडोज ८ सिस्टीम बाजारात आली . मात्र ,
टच डिव्हाइसमध्ये या ऑपरेटिंग सिस्टीमला अपेक्षित प्रतिसाद पाहता , कंपनीने या ऑपरेटिंग सिस्टिमचे
सुधारित व्हर्जन ८ . १ लाँच केले आहे .
टच स्क्रीनची गरज नाही
टच डिव्हाइस डोळ्यासमोर ठेवून इंटरफेस अधिक टच आधारित करण्यात आला आहे . स्टार्ट बटनचा पर्याय
पुन्हा उपलब्ध झाला आहे . मात्र , यात तो पूर्वीसारखा नाही . यात यूजर क्लिक वा टॅप करून संबंधित प्रोग्रॅमसुरू करू शकतो . मशिन हे डेस्कटॉप मोडमध्येही सुरू करता येते . यामुळे कंपन्यांना टच स्क्रीन विकत
घ्यावा लागणार नाही , याची काळजी या फीचरद्वारे घेण्यात आली आहे . हे या नव्या अपडेटचे प्रमुख वैशिष्ट् आहे .
अप्लिकेशनचे अपडेट करण्याचे रिमाइंडर यावर येतात आणि बॅकग्राउंडमध्ये ते अपडेट होऊ शकते . लॉगइन
न करता फोटो काढू शकता वा स्काइप कॉल घेऊ शकता . यासाठी फक्त स्वाइप करावे लागते . तसेच ,
स्क्रीन लॉक असताना सोशल नेटवर्किंगचे नोटिफिकेशन कळण्याची सोय यात आहे . ब्राउजिंग करताना किती
साइट सर्फ करायच्या यावर आता मर्यादा नाहीत .
incoming search terms : windows 8.1 launched by Microsoft to overcome errors and bugs in windows 8