किमान किंमतीपेक्षा थोडा अधिक खिसा रिकामा करण्याची तयारी आणि ब्रँडचे दडपणझुगारले , की तुमच्या
पसंतीचा आणि बजेटमधील मोबाइल तुमचा होऊ शकतो . सध्या बाजारात नोकिया (मायक्रोसॉफ्ट ), सॅमसंग , अॅपल , एलजी , सोनी ,ब्लॅकबेरी आणि एचटीसी या ब्रँडेड कंपन्यांशिवाय अन्य कंपन्यांचेही तुलनेने स्वस्त
आणि हायब्रँडच्या जवळपास फीचर्स असणारे मोबाइल अत्यंत कमी किंमतीत उपलब्ध आहेत .
सात हजारांहून कमी किंमत असलेल्या अँड्रॉइडफोनची ही झलक …
व्हिडिओकॉन ए २४
दिसायला देखणा .. ही व्हिडिओकॉन ए २४ची खासियतम्हणावी लागेल . स्लीम बॉडी आणि दोन रंगांतीलप्लास्टिक केस . याचा डिस्प्ले अधिक मोठा आहे . व्हॉइसकॉलचा दर्जा आणि ओव्हरऑल नेटवर्क कव्हरेज उत्तम आहे.
फीचर्स :
अँड्रॉइड ४ . २ . २ , ४ इंची टचस्क्रीन ( ८०० *४८० पिक्सेल ),
१ . २ गिगाहर्ट्झ ड्युअल कोअर प्रोसेसर, २५६ एमबी रॅम ,
५१२ एमबी इंटर्नल मेमरी (३२जीबीपर्यंत वाढविता येऊ शकते .)
रीअर कॅमेरा ३ . २मेगापिक्सल , फ्रंट व्हीजीए कॅमेरा ,
ड्युअल सिम ,वायफाय , ब्लूटूथ , १४५० एमएएच ( मिली अॅम्पिअर परतास ) क्षमतेची लिथियम आयन बॅटरी ७२० पी क्षमतेचे व्हिडीओ अत्यंत सुरळीत आणि विनाअडथळा चालतात .
हेडफोनवर ऑडिओ अत्यंत सुस्पष्ट आणि मोठ्या आवाजात ऐकू येतात .
कमतरता : ३जी सपोर्ट नाही , फक्त २५६ एमबीची रॅम , कमी पिक्सेलच्या कॅमेऱ्यामुळे फोटोमध्ये शार्पनेस
कमी आढळतो .
कार्बन स्मार्ट ए २६
टचस्क्रीन , बॅक स्टेनलेस स्टील कव्हर आणि बॅकलाइट टच बटणामुळे कार्बन स्मार्ट ए २६चे सौंदर्य खुलते .
फीचर्स :
अँड्रॉइड ४ . १ , ५ इंचाची मोठी टचस्क्रीन ( ८५४ * ४८० पिक्सेल ),
१ गिगाहर्ट्झ क्षमतेचा ड्युअलकोअर प्रोसेसर , ५१२ एमबी रॅम ,
इंटर्नल मेमरी ४ जीबी ( ३२ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते .),
५मेगापिक्सेलचा रीअर कॅमेरा , १ . ३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा ,
ड्युअल सीम , वायफाय , ब्लूटूथ , २०००एमएएच ( मिली अॅम्पिअर पर तास ) क्षमतेची लिथियम आयन बॅटरी ( १६ तास बॅटरी चालत असल्याचा दावा)
कमतरता : स्पीकर्सचा साउंड तुलनेने कमी , टेंपल रनसारख्या गेमसाठीच उपयुक्त ,
३जी सुविधा नाही , कमीवेगवान इंटरनेट आणि ब्राउजिंग , फोटोदेखील कमी पिक्सेलचे ,
व्हिडिओ परफॉर्मन्सही कमीच .
मॅक्स एएक्स ५०
विविध टास्क , वेब ब्राउजिंग आणि अँग्री बर्डसारखे गेम खेळण्यासाठी उपयुक्त , बहुतेक सर्व ऑडिओ आणिव्हिडीओ फॉरमॅटसाठी उपयुक्त , ७२० पी क्षमतेच्या एचडी व्हिडीओसाठीही अत्यंत उपयुक्त , ५ इंचाच्या मोठ्यास्क्रीनमुळे टायपिंगचाही सुखद अनुभव
फीचर्स :
अँड्रॉइड ४ . ४ . २ , ५ इंची टचस्क्रीन ( ८०० * ४८० पिक्सेल ),
१ गिगाहर्ट्झ क्षमतेचा ड्युअलकोअर प्रोसेसर ,
इंटर्नल मेमरी ४ जीबी ( ३२ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते ),
५ मेगापिक्सलचा रीअर कॅमेरा, फ्रंट व्हीजीए कॅमेरा , ड्युअल सीम ,
थ्रीजी , वायफाय , ब्ल्यूटूथ , २००० एमएएच ( मिली अॅम्पिअर पर तास) क्षमतेची लिथियम आयन बॅटरी ,
किंगसॉफ्ट ऑफिस , निम्बुझ आणि ऑपेरा मिनी .
कमतरता : कमी क्षमतेचे आवाज ऐकण्यासाठीच ऑडिओची रचना , माइकची क्षमताही अत्यंत अल्प .
झोलो ए ५०० एस
ब्लॅकबेरी झेड १० सारखी रचना , चांगला टचस्क्रीन , हँडसेटचा परफॉर्मन्सही अव्वल दर्जाचा ,
रेडलाइनरशसारखे गेम्स चांगल्या पद्धतीने खेळू शकता येईल , अशी रचना , एचडी दर्जाचे व्हिडीओ पाहतानाहीचांगलाअनुभव येतो .
फीचर्स :
अँड्रॉइड ४ . २ , ४ इंची टचस्क्रीन ( ८०० * ४८० पिक्सेल ),
१ . २ गिगाहर्ट्झ क्षमतेचा ड्युअलकोअर प्रोसेसर , ५१२ एमबी रॅम ,
इंटर्नल मेमरी ४ जीबी , ५ मेगापिक्सलचा रीअर कॅमेरा , फ्रंट व्हीजीएकॅमेरा ,
ड्युअल सीम , थ्रीजी , वायफाय , ब्लूटूथ , १४०० एमएएच ( मिली अॅम्पिअर पर तास ) क्षमतेची बॅटरी
इंटेक्स क्लाउड वाय २
अत्यंत सक्षम यूजर इंटरफेस , रिस्पॉन्सिव्ह टचस्क्रीन, अत्यंत खणखणीत म्युझिक प्लेबॅक, थ्रीजी वापरतानाबॅटरी ११ तास चालत असल्याचा कंपनीचा दावा, बजेट अँड्रॉइड फोन म्हणून सर्वोत्तम .
फीचर्स :
अँड्रॉइड ४ . २ , ४ इंची टचस्क्रीन ( ८०० * ४८० पिकेल ),
१ गिगाहर्ट्झ क्षमतेचा ड्युअल कोअरप्रोसेसर, ५१२ एमबी रॅम ,
इंटर्नल मेमरी ४ जीबी ( ३२ जीबीपर्यंत वाढवता येणे शक्य ),
५ मेगापिक्सेलचारीअर कॅमेरा , १ . ३ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा,
ड्युअल सीम, थ्रीजी, वायफाय, ब्लूटूथ , १५०० एमएएच( मिली अॅम्पिअर पर तास ) क्षमतेची बॅटरी .
लाव्हा थ्रीजी ४०२
पॉकेट फ्रेंडली फोन, सिलिकॉन केसमुळे चांगली ग्रिप मिळते. विविधरंगी डिस्प्लेमुळे दिसण्यास देखणा,थ्रीजीपी फॉरमॅटमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग शक्य, एमओव्ही अर्थात मध्यम दर्जाच्या मुव्हिज अडथळ्यांविना शक्य,
उच्च क्षमतेचे लाउडस्पीकर
फीचर्स : अँड्रॉइड ४ . २ . २ , ४ इंची टचस्क्रीन ( ८०० * ४८० पिक्सेल ),
१ . २ गिगाहर्ट्झ ड्युअल कोअरप्रोसेसर , २५६ एमबी रॅम ,
इंटर्नल मेमरी ५१२ एमबी ( ३२ जीबीपर्यंत वाढविता येते .),
३ एमपी रीअरकॅमेरा , फ्रंट व्हीजीए कॅमेरा , ड्युअल सीम , वायफाय ,
ब्लू टूथ , १५०० एमएएच ( मिली अॅम्पिअर पर तास )क्षमतेची लिथियम आयन बॅटरी .
incoming earch terms:
kabonn, xolo, lava, intex, videocon, maxx android smartphones
cheapest smartphones under rs 7000,