या फोनबद्दल गॅजेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह होता. लॉंच करण्यापूर्वीच फोनची छायाचित्रे आणि स्पेसिफिकेशन्स लीक झाले होते. या फोनमध्ये 41 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. एवढा पावरफुल कॅमेरा कोणत्याच स्मार्टफोनमध्ये नाही.
नुकताच सोनीने होनामी झेड1 स्मार्टफोन लॉंच केला होता. त्यात वेगळी लेंस लावण्याची सुविधा आहे. हा फोनदेखील याला टक्कर देऊ शकत नाही.
नोकियाचा हा फोन प्रचंड लोकप्रिय झाला आहे. आता हा भारतात दाखल झाला आहे. हा फोन 50 हजार रुपयांच्या जवळपास उपलब्ध होण्याची शक्यता आहे. भारतात फोनला चांगला प्रतिसाद मिळू शकतो, असा कंपनीचा अंदाज आहे.
या फोनमध्ये 4.5 इंचाची स्क्रीन आहे. याशिवाय 1280*768 मेगापिक्सेल फुल एचडी रिझॉल्यूशन मिळेल. स्क्रीनमध्ये गोरिला ग्लास3 प्रोटेक्शनचा वापर केला आहे. त्यामुळे स्क्रीन अतिशय मजबूत आहे फोनचा AMOLED HD+ डिस्प्ले अतिशय आकर्षक आहे. स्क्रीन अतिशय संवेदनशील आहे. ग्लोव्ज घालूनही ऑपरेट होऊ शकते.फोनमध्ये ड्युअल कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 1.5 GHz प्रोसेसवर आहे. याशिवाय 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल मेमरी आहे. यामुळे फोन अतिशय वेगवान आहे. गेमिंग आणि एचडी व्हिडिओ पाहणा-यांसाठी पर्वणीच राहील.
नोकियाने या फोनसाठी ‘झूम रिइन्व्हेंटेड’ या टॅगलाईनचा वापर केला आहे. ही लाईन या फोनसाठी तंतोतंत फिट बसते. फोनला 41 मेगापिक्सेलचा बॅक कॅमेरा आहे. तर 1.2 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. कॅमेरा ऑटो फोकस, 3X झूम, एलईडी व्हिडिओ आणि 1080 पिक्सेलची व्हिडिओ रेकॉर्डींग करणे शक्य आहे. फोनचे व्हिडिओ कॉलिंग फिचरही आकर्षक आहे.फोनमध्ये 3जी आणि 4जी तंत्रज्ञानही आहे. त्यामुळे वेगवान इंटरनेटचा अनुभव घेता येऊ शकतो. वेगवान इंटरनेट वापरणा-यांसाठी हा एक स्मार्ट ऑप्शन आहे.
incoming search terms :
nokia lumia 1020
nokia lmia specs windows 8 phone
best smartphone camera ever 41 MegaPixel camera