हा जगातला सर्वात मोठा, अती स्लीम आणि वॉटरप्रूफ एचडी स्मार्टफोन असल्याचा दावा सोनी कंपनीनं केला आहे. वॉटरप्रूफ आणि धूळरोधित असलेल्या या फॅबलेट (फोन+टॅबलेट) मध्ये १९२०x१०८० पिक्सेल रेझॉल्यूशन असणारा ६.४४ इंचीचा फूल एचडी डिस्प्ले आहे.
यामध्ये २.२ जीबी क्वॉड-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८०० प्रोसेसर आहे. यामध्ये अँड्रॉइड ४.२ जेली बीनवर वापरता येणार आहे. यात १६ जीबी स्टोरेज क्षमता आहे. तसेच यूजर्ससाठी ११ जीबी स्टोरेज मिळणार आहे. यामध्ये ६४ जीबी पर्यंत मायक्रो-एसडी कार्ड वापरता येणार आहे.
या स्मार्टफोनमध्ये ३०००mAh बॅटरी देण्यात आली आहे. या फोनच्या बॅटरीची क्षमता जीएसएमवर ११ तास आणि ५५० तास स्टँडबाय अशी आहे. या फोनमध्ये १२० तास संगीत ऐकता येणार तर साडे पाच तासापर्यंत व्हिडिओ पाहता येणार आहे. काळा, पांढरा आणि वांगी रंगामध्ये हा स्मार्टफोन बाजारात उपलब्ध होणार आहे.
फोनची लांबी १७९.४, रूंदी ९२.२ आणि जाडी ६.५ एमएम एवढी असून वजन २१२ ग्रॅम इतकं आहे. यात फोटो आणि व्हिडिओसाठी एचडी रेकॉर्डिंग करण्यासाठी ऑटोफोकस सोबत ८ मेगापिक्सल मेन कॅमेरा आहे. दोन मेगापिक्सेला फ्रंट कॅमेरा आहे. पेन किंवा पेन्सिलसारखं यावर तुम्हाला लिहिताही येणार आहे.