सॅमसंग अधिक स्मार्ट, नऊ भारतीय भाषांची जोड

सॅमसंग अधिक स्मार्ट, नऊ भारतीय भाषांची जोडसॅमसंगने टॅब्लेटचे एक नवे मॉडेल बाजारपेठेत आणले असून यात नऊ भारतीय भाषांचा समावेश करण्यात आला आहे. हिंदी, पंजाबी, बंगाली, तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, मराठी आणि गुजराती भाषांमध्ये हा टॅब उपलब्ध आहेत. गॅलक्सी श्रेणीतील स्मार्टफोनसुद्धा या भारतीय भाषांत उपलब्ध होणार आहेत.



रुपयाच्या घसरणीमुळे सॅमसंग कंपनीने जुलैत मोबाइलच्या किमतीत 3 टक्क्यांची वाढ केली. रुपयाच्या अवमूल्यनामुळे मोबाइलच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु या किंमतवाढीचा विक्रीवर काहीच फरक पडणार नसल्याचे मोबाइल कंपनीच्या व्यवस्थापनाचे मत आहे.

Exit mobile version