ग्राहक या नव्या आणि जबरदस्त टॅब्लेटसाठी थोडे अधिक पैसे देण्यासाठी तयार होतील असा गुगलचा दावा आहे. नवीन नेक्सस 7 या श्रेणीतील एक शानदार टॅब्लेट आहे. विशेष म्हणजे याची किंमतही मिड रेंज टॅब्लेट इतकीच आहे. या टॅब्लेटच्या येण्याने अॅपल आणि अॅमेझॉनसारख्या कंपन्यांना मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तंत्रज्ञानाच्या या युगातील ही उंदरा-मांजराची स्पर्धा खूपच रोमांचक होऊ शकते. त्याशिवाय बाजारात लॉंच होणारे नवीन टॅब्लेट ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. आता गुगलच्या या नव्या नेक्सस 7कडून मोठया अपेक्षा केल्या जात आहेत
सुमारे एक वर्षापूर्वी गुगलने आपला पहिला फर्स्ट जनरेशन नेक्सस 7 टॅब्लेट लॉंच केला होता. हा टॅब्लेट लॉंच झाल्यानंतर स्मार्टफोनच्या दुनियेत ब्रँडेड आणि लेटेस्ट तंत्रज्ञानाच्या टॅब्लेटने धूम केली होती. नेक्ससला टक्कर देण्यासाठी अनेक कंपन्यांनी आपले टॅब्लेट बाजारात आणले होते. आता गुगलचा हा नवा धमाकाही अशीच कमाल करण्याची शक्यता आहे. हा टॅब्लेट 7 इंच स्क्रीनबरोबर येईल. त्याचबरोबर, हा फक्त 2 मिमी पातळ आहे. याचा लुक तुम्हाला आकर्षित केल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर या नवीन नेक्ससचे वजन मागील मॉडेलपेक्षा 50 ग्रॅम कमी आहे. या नवीन नेक्ससची किंमत 13740 इतकी असेल.
याच्या वेगाबद्दल बोलायचे म्हटले तर नेक्सस 7मध्ये 2जीबी रॅम आहे. याच्या मेमरीचा टॅब्लेटच्या स्पीडवर खूप परिणाम करेल. त्याचबरोबर या टॅब्लेटमध्ये 1.5 GHz चा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आहे. हा नवा नेक्सस 7 अँड्राएड 4.3 ओएसवर काम करेल. गुगलने या नव्या अँड्राएडलाही याच इव्हेंटमध्ये लॉंच केले. याचाच अर्थ अँडव्हान्स अँड्राएड ओएस असलेला नेक्ससचा एकमेव टॅब्लेट असेल.