९९९० रुपयाला आयबॉलचा नवीन टॅबलेट नऊ इंची टच स्क्रीन डिस्प्ले

iballमोबाइलप्रेमींना ‘आयबॉल अँडी’सारखे जबरदस्त स्मार्टफोन देणाऱ्या ‘आयबॉल’ने आता ‘आय ९०१८’ हा नवा टॅबलेट बाजारात आणला आहे. अद्ययावत तंत्रज्ञान आणि नवनव्या अॅप्लिकेशन्सचा भरणा असलेला हा टॅबलेट अवघ्या ९ हजार ९९० रुपयांत मिळणार आहे. नऊ इंची टच स्क्रीन डिस्प्ले हा या टॅबलेटचा यूएसपी आहे.



आयबॉल टॅबलेटची वैशिष्ट्ये :


> या टॅबलेटची स्क्रीन १०२४ x ६०० पिक्सल्स रेझोल्युशनची असून त्यामुळे त्याला एक पॉलिश लूक आहे.


> ‘आय ९०१८’ टॅबलेटमध्ये १ गीगाहर्टसचा ड्युअल कोअर कोर्टेक्स ए ७ प्रोसेसर असून त्यामध्ये एमएल ४०० एमपी २ जीपीयूचा (ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट) सपोर्ट असणार आहे.


> यामध्ये सर्वात अपडेटेड अँड्रॉइड ४.२ ऑपरेटिंग सिस्टिम उपलब्ध करून देण्यात आली आहे. एक जीबी रॅम आणि ८ जीबी इंटर्नल मेमरीबरोबरच मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने ही मेमरी ३२ जीबी पर्यंत वाढवता येणार आहे.


> आय ९०९८मध्ये वाय फाय एचडीएमआय पोर्ट, मायक्रो यूएसबी पोर्ट, ब्लूटूथ आणि यूएसबी डोंगल कनेक्टीव्हिटीही देण्यात आली आहे.


> २ मेगाफिक्सल कॅमेराबरोबरच व्हिजीए फ्रण्ट कॅमेरामुळे या टॅबलेटच्यामार्फत व्हिडीओ कॉलिंग करता येणे शक्य होणार आहे.


> ४ हजार एमएएच बॅटरी सपोर्ट असणारा हा टॅबलेट लो कॉस्टींग मार्केटमध्ये टक्कर देण्यासाठी बाजारात उतरवल्याची चर्चा आहे.

Exit mobile version