इंटरनेटचा अॅक्सेस हा मुलांसाठी मर्यादित कसा करायचा ,असा प्रश्न अनेक पालकांना पडतो. गुगलने अँड्रॉइच्या नव्या व्हर्जनमध्ये त्याचा विचार केला आहे. त्यामुळे आपल्या पाल्यासाठी एखादी प्रोफाइल तयार केल्यावर त्याला कसा इंटरनेट अॅक्सेस ठेवायचा हे निश्चित करता येते ; तसेच क्रोम ब्राऊजर डिसेबल करता येतो. मात्र , पोर्न ब्लॉक करण्याचा फिल्टर यात नाही. अँड्रॉइड ४.३ ब्लू टूथ स्मार्ट आणिएव्हीआरसीपी मानांकन पूरक आहे.
व्हायरस स्कॅनिंग
अँड्रॉइडवर काही लाख अॅप्लिकेशन उपलब्ध आहेत. मात्र ,अॅप डाऊनलोड करताना व्हायरस येण्याची शक्यता अधिक असते. अँड्रॉइडच्या नव्या व्हर्जनमध्ये अॅप डाऊनलोड केल्यास गुगलकडे उपलब्ध डाटाबेसमधून व्हायरस स्कॅनिंग केले जाते. त्यामुळे डाऊनलोड केलेल्या अॅपमध्ये व्हायरस आहे का , याची कल्पना येते.
व्हिडीओचा दर्जा उंचावणार
यात डीआरएम फीचरचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे उच्च दर्जाच्या व्हिडीओचे स्ट्रीमिंग चांगले होऊशकते. यू ट्यूबवरील व्हिडीओसह अन्य प्रकारचे व्हिडिओ टॅब्लेट , फोनच्या स्क्रीनवर एचडीटीव्हीसारखे दिसण्यास मदत होते.
थ्रीडी गेमसाठीही
डायल पॅडवर फोन नंबर आणि नावाची शिफारस होणार आहे. यात नवीन काय , असा प्रश्न अँड्रॉइड वापरणाऱ्यांना नक्की पडेल. मात्र , काही कंपन्यांनी हे फीचर यापूर्वीच अँड्रॉइड हँडसेटवर उपलब्ध करून दिलेले आहे. मोबाइल किंवा टॅब्लेटवर गेम खेळणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. यूजरना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी आणि गेम विकसित करणाऱ्यांना मदत करण्यासाठी नव्या सिस्टिममध्ये ओपन जीएल ईएस ३.० चा समावेश करण्यात आला आहे. यामुळे गेम डेव्हलपरना थ्रीडी गेम अॅप अधिक चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देता येऊ शकणार आहेत. पॉप-अपसारखे नोटिफिकेशन फोनच्या स्क्रीनवर येणार आहेत. फोटो डेड्रीम हे नवे फीचर समाविष्ट करण्यात आले आहे. यामुळे चांगल्या फोटो अल्बमध्ये थेट जाता येणार आहे.
गुगल कंपनीने अँड्रॉइड जेलीबीनचे ४.३ हे नवे व्हर्जन विकसित करताना अनेक गोष्टी लक्षात घेतल्याचे फीचरवरून स्पष्ट होत आहे. यामुळे अँड्रॉइड डिव्हाइस वापरणाऱ्यांना नक्कीच अधिक चांगला अनुभव मिळेल , अशी अपेक्षा आहे.