या नव्या क्लासिक अल्फान्यूमरिक कीपॅड फोनला मोठी 2.4 इंचांचा स्क्रीन, सुबक डिझाइन आणि बोल्ड रंगामुळे एक नवी ओळख मिळवून दिली आहे. स्मार्ट कॅमे-याला स्मार्ट सॉफ्टवेअरची जोड दिल्याने 3.5 जीच्या वेगामुळे हा फोन काम आणि खेळण्यासाठीचा आवडता पर्याय ठरेल. यूटीव्ही मूव्हीज अॅपमुळे 3.5 जी इंटरनेटवर मोफत मूव्ही स्ट्रिमिंग करता येईल.
इंटरनेटचा सर्वाधिक चांगला वापर करता येण्याची मोठी मागणी तरुण, शहरी, हायपर-सोशल आणि परवडण्याजोग्या किमतीत सर्वात स्मार्ट फीचर्स हवी असणा-या ग्राहकांकडून होत आहे. ती पूर्ण करण्यासाठी नोकिया मोबाइल उपकरणांवर वेगवेगळ्या किमतींची अनेकानेक स्मार्ट इनोव्हेशन्स आणत असल्याचे नोकिया इंडियाच्या विपणन विभागाचे संचालक विरल ओझा यांनी सांगितले.
काय आहे खास ?
० 3.2 मेगापिक्सेल क्षमतेचा स्मार्ट कॅमेरा
० सिक्वेन्शियल शॉट्स- केवळ एका क्लिकमध्ये पाच फ्रेम एकापाठोपाठ एक कॅप्चर, गॅलरीतला फोटो थेट सोशल नेटवर्क्सवर टाकण्याची सोय
० फाइव्ह इन वन कॅमेरा अॅप फोटोला पाचपैकी एक कॅमेरा इफेक्ट देण्याची सुविधा
० स्लॅम फोटो किंवा काँटॅक्ट कार्ड्स शेजारच्या ब्ल्यूटूथसज्ज फोनमध्ये सोप्या आणि मोजक्या क्लिक्सनी ट्रान्स्फर करतो. यासाठी पेअर डिव्हाइसची गरज नाही.
० नोकिया एक्स्प्रेस ब्राउजर बिल्ट-इन असल्याने मोबाइल ब्राउझिंग 90 टक्के अधिक सक्षम
नोकिया 301 ची खास वैशिष्ट्ये
3.5 जी इंटरनेटचा अनुभव
स्मार्ट कॅमेरा
पॅनोरमा शॉट्स
सिक्वेन्शियल शॉट्स
सेल्फ पोर्ट्रेट
फाइव्ह इन वन कॅमेरा अॅप
स्टँडबाय वेळ- 34 दिवसांपर्यंत
टॉक टाइम- 20 तासांपर्यंत
उपलब्ध रंग- सायन, पिवळा, मॅजेंटा, काळा आणि पांढरा
किंमत : 5349 रु.