गुगल मार्स – जगभरातील अवकाश संस्थांनी मंगळावरील मोहिमांची आखणी सुरू केलेली असतानाच , ‘ गुगल ‘ ने मंगळाच्या पृष्ठभागाचा थ्रीडी नकाशा इंटरनेटवर आणला. मंगळाच्या आतापर्यंतच्या नकाशांपैकी ‘ गुगल ‘ चे नकाशे सर्वाधिक अत्याधुनिक असल्याचा त्यांचा दावा आहे. ‘ नासा ‘च्या मदतीने हे फीचर सुरू करण्यात आले होते.
गुगल स्कॉलर – इंटरनेटवरून साहित्याचा शोध घेणाऱ्यांसाठी ‘ गुगल ‘ ने हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. सध्या या ठिकाणी इंग्रजी साहित्य उपलब्ध असून , लवकरच हिंदीसह पोर्तुगीज , चिनी , जर्मन अशा अनेक भाषांमधील साहित्य उपलब्ध होणार आहे. शिवाय , आवडीच्या क्षेत्रातील अपडेटही या ठिकाणी उपलब्ध आहेत.
आर्ट प्रोजेक्ट – यामध्ये जगातील अप्रतिम अशा कलाकृती पाहता येतात. एकप्रकारे जगातील १५० नामवंत संग्रहालयांची ही ऑनलाइन सहलच ठरते.
इनपुट टूल्स – एखादा संदेश आपल्याला हव्या त्या भाषेत आणि स्टाइलमध्ये पोहोचविण्यासाठी या फिचरचा उपयोग होतो. या फीचरमध्ये नुकताच हिंदी भाषेचाही समावेश करण्यात आला आहे.
थिंक इनसाइट – मार्केटच्या शोधामध्ये असणाऱ्या व्यावसायिकांसाठी हे उपयुक्त फीचर आहे. यामध्ये एखाद्या क्षेत्रातील ग्राहकांचे बदलते कल , मार्केटचे अंतरंग , त्याविषयीचा अभ्यास आणि संशोधन यांची माहिती मिळते.
मॉडरेटर – एखादी मीटिंग किंवा प्रेझेंटेशनची तयारी करण्यासाठी हे फीचर उपयुक्त आहे. या मीटिंगमध्ये कोणत्या संभाव्य प्रश्नांची विचारणा होऊ शकते , चर्चा कशी होऊ शकते यावर या फीचरमध्ये चर्चा होते. मात्र , याचा वापर करण्यासाठी , यूझरकडून वेगवेगळ्या टॉपिकविषयी फीडबॅक मागितले जातात.
एनक्रिप्टेड – ‘ गुगल ‘ आणि यूझरच्या कम्प्युटरमधील कम्युनिकेशनसाठी हे फीचर आहे. एकदम सुरक्षित आणि खासगी सर्चसाठी हे फीचर उपयुक्त आहे.
स्कीमर – एखादी नवी गोष्ट शोधणे आणि ती परस्परांमध्ये शेअर करण्यासाठी याचा उपयोग होतो. अगदी ‘ गुगल प्लस ‘ मध्येही ‘ स्क्रीमिंग ‘ असे चिन्ह दिसते , त्यातून ते यूझर या फीचरशी जोडले गेल्याचे दिसून येतात. अगदी एखादा सिनेमा आवडला , एखादा प्रसंग सर्वांना सांगावासा वाटला , त्यांच्यासाठी हे फीचर महत्त्वाचे आहे.
Related Keywords :
Google
Google Mars Moderator schemer think insight scholar