फेसबूकचा नवीन लूक भारतात दाखल

fbuklookभारतामध्ये फेसबूकवरील नेटक-यांना आता त्यांचा व्हर्चुअल लूक बदलता येणार आहे. कारण फेसबूकने मार्च महिन्यात लाँच केलेला नवीन लूक भारतामध्येही अॅक्टीव्ह करता येणार आहे. या नवीन लुकमुळे युझर्सला अगदी नव्यापद्धतीने न्यूजफीड पाहता येणार आहे. या न्यूजमध्ये फोटोचा आकार मोठा असणार असून हा लूक व्हिज्युअली आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

फेसबूकच्या या नवीन इंटरफेसमध्ये कॅप्शनबरोबरच फोटो मोठ्या आकारात दिसणार आहे. यामध्ये फोटोच्या आजूबाजूची व्हाइट स्पेस जास्त ठेवण्यात आल्याने संपूर्ण लक्ष फोटोवर केंद्रीत करता येते. ‘गुगल प्लस’शी स्पर्धा करण्यासाठी फेसबूकने हा नवीन फंडा वापरल्याचे तज्ञांचे मत आहे. कारण गुगल प्लसप्रमाणे फेसबूकच्या या नवीन लूकमध्ये आर्टिकल आणि व्हिडिओला थम्बनेल ऑपशन देण्यात आला आहे. आर्टिकल आणि व्हिडिओच्या थम्बनेलच्या फॉन्टचा आकारही वाढवण्यात आला आहे.

नवीन लूकमध्ये पानाच्या डाव्याबाजूला प्रोफाइल, पेज आणि ग्रुप इन्फोबरोबरच चॅट बारचाही ऑप्शन देण्यात आला आहे. मात्र तुम्हाला हा नवीन लूकमधील ऑप्शन हाइड करता येणार नाहीत. या लूकमध्ये जर तुमच्या अनेक मित्रांनी एकच फोटो शेअर केला असेल तर सध्याच्या टेक्स्ट नोटीफिकेशन ऐवजी फोटोसहीत नोटीफिकेशन मिळणार आहे. तसेच सर्व अपडेट ऐवजी तुम्हाला फक्त काही सिलेक्टेड आणि लिमिटेड अपडेट्स पाहता येणार आहे.

नवीन न्यूज फीडचा लूक सरसकट सर्वांना मिळणार नसून हळूहळू हा लूक सर्वांच्या प्रोफाइलमध्ये दिसून येणार आहे. मात्र तुम्हाला फेसबूकच्या वेटिंग लिस्टमध्ये आपले नाव नोंदवू शकता. फेसबूकच्या वेटिंग लिस्टचा लूक पाहण्यासाठी येथे क्लिक करा. या लिंकवर तुम्हाला नवीन न्यूज फीड कसा दिसेल त्याची झलक पाहता येईल. या पानावर सर्वात खाली तुम्हाला जॉइण्ट वेटिंग लिस्ट ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक केल्यास तुम्ही या वेटिंग लिस्टमध्ये अॅड व्हाल. तसेच तुम्हाला तुमच्या कोणत्या फ्रेण्डसने हा नवीन लूक वापरला आहे का हेही कळेल.


Related Keywords :
Facebook changed
new facebook with graph search comes to india
facebook look change and search

Exit mobile version