जीमेल बदलतंय : अपडेटेड व्हर्जनमध्ये आकर्षक फंक्शन्स

gmail.jpgगेल्या महिन्यात गुगलने ब्लू जीमेल सुरू करत असल्याचे सांगत सर्वांना ‘एप्रिल फूल’ केले होते. पण यात केवळ ‘ब्लू’ एवढेच फूल होते. बाकी गुगल जीमेलची अपडेट व्हर्जन लवकर सादर करणार हे आता निश्चित झाले आहे. जीमेलच्या या अपडेटेड व्हर्जनमध्ये खूपच मोठे बदल होणार असून त्यात जीमेलच्या लूकबरोबरच काही आकर्षक फंक्शन्सही अॅड होणार आहेत. 



सध्याच्या टॅब्युलर स्पेसच्या जगानुसार नवे जीमेलही टॅब स्वरुपात दिसणार आहेत. यात ५ विविध टॅब दिसतील. त्यामध्ये प्रायमरी, सोशल, प्रमोशन्स, अपडेट्स आणि फोरम यांचा समावेश असेल. नेहमीचे आणि महत्त्वाचे मेल्स स्टँडर्ड किंवा प्रायमरी बॉक्समध्ये दिसणार आहेत. तर फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्वरील मेल सोशल टॅबखाली दिसतील. इ-कॉमर्स साइट्स, वेगवेगळ्या ऑफर्सचे मेल प्रमोशन्स या टॅब अंतर्गत दिसतील. फोरममध्ये मेलिंग लिस्ट असणार आहे. तर अपडेट्समध्ये कन्फर्मेशन मेल असतील. सुरुवातीला या विविध टॅबमध्ये युजरला स्वतःच हे मेल ड्रॅग करावे लागतील. मात्र हळूहळू तुमच्या मेलचे वर्गीकरण करणे गुगल ‘शिकणार’ आहे. यातील प्रत्येक टॅबमध्ये वाचलेले, न वाचलेले, प्रत्युत्तर आलेले मेल्स स्वतंत्र दिसणार आहे. यामुळे इमेल्स अधिक चांगल्या पद्धतीने हाताळता येतील, असा कंपनीचा दावा आहे. 


गेल्या वर्षी गुगलने नेहमीच्या इनबॉक्ससोबत प्रायॉरिटी इनबॉक्स सादर केला होता. यंदा नव्या लूकमध्ये नेहमीचे मेल आणि प्रायॉरिटी मेलमध्ये बराच फरक दिसणार आहे. गुगल केवळ डेस्कटॉपसाठीच नव्हे तर मोबाइल युजर्ससाठीही हे अपडेट्स सादर करणार आहे. सध्या डेस्कटॉपसाठीचे अपडेट्स मिळायला सुरुवात झाली असून अँड्रॉइड आणि आयओएसची व्हर्जन्स काही आठवड्यात सादर होणार आहेत. त्यामुळे या अॅपचा वेग वाढेल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही. 


सध्या तरी नवीन लूक वापरण्याची सक्ती युजर्सवर नाही. त्यामुळे ट्रायल म्हणून युजर्स नवीन लूक ट्राय करू शकतो. आवडले नाही तर पुन्हा जुन्या लूकवर परत येऊ शकतो. पण भविष्यात सर्वांना हा लूक वापरावा लागणार, हे निश्चित. शेवटी काही काळानंतर बदल करणे सर्वांनाच आवश्यक असते. गुगलच्या या बदलामागे मात्र आऊटलूककडून निर्माण झालेली स्पर्धा, हे कारण नाकारता येणार नाही. 


Related Keywords :
Gmail
new look
tabular form look
email
android

Exit mobile version