हे उपकरण आपल्या डोळ्यांच्या एका कोपऱ्यामध्ये, चष्म्याप्रमाणे स्मार्टफोनसारखे बसवता येते.
‘ गुगल ग्लास ‘ च्या निर्मितीमागील हेतू स्पष्ट करताना, ‘ गुगल ‘ च्या संस्थापकांपैकी एक असणारे सर्जी ब्रिन म्हणतात, ‘ आपण आपल्या स्मार्टफोनकडे पाहत, मानखाली घालून फिरत असतो. अशा वेळी आपली मान आणि हात दोन्हीही मोकळे कशापद्धतीने करता येतील? असा विचार आम्ही केला. ‘ एकूणच स्मार्टफोनचा वापर वाढत असताना, तो अधिकाधिक सोप्या पद्धतीने वापरण्यासाठी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. ‘ शेवर्ले ‘ ने मागील महिन्यात एक नवे उपकरण आणले असून, त्यामध्ये एक महिला गाडी चालवत असतानाही केवळ आवाजाच्या माध्यमातून संदेश वाचताना दाखविली आहे. तंत्रज्ञान विश्वातील या नव्या ‘ अॅप्रोच ‘ मधून ‘ गुगल ग्लास ‘ आपल्यासमोर आला आहे. तसेच, एखादा नवा संदेश आल्यानंतर ‘ गुगल ग्लास ‘ मधून एखादा संदेश लुकलुकणार नसल्यामुळे आपले लक्ष विचलितही होणार नाही. केवळ छोटासा बीप वाजेल आणि संदेश आल्याची सूचना आपल्याला मिळेल.
‘ गुगल ग्लास ‘ किंवा अशा प्रकारची उपकरणे आपल्या सध्याच्या वेगवान आयुष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. आपल्या कामावर, परिसरातील घडामोडींवर पूर्ण लक्ष ठेऊन असतानाच, स्मार्टफोनच्याही संपर्कात राहणे यामुळे शक्य होणार आहे. ‘ गुगल ग्लास ‘ मुळे एखाद्या गोष्टीकडे पाहण्याच्या किंवा लक्ष देण्याच्या क्षमतेवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावाही ‘ गुगल ‘ कडून करण्यात आला आहे.
मुळातच एखादी गोष्ट पाहणे आणि त्याकडे लक्ष देणे, या दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. त्यामुळे माणसाचे लक्ष विचलित न होऊ देता, माणसाची विचार करण्याची पद्धत आणि मेंदूतील प्रक्रिया यांचा विचार करूनच हे उपकरण विकसित करण्यात आले आहे. त्यामुळेच हे उपकरण अत्यंत सुरक्षित आणि क्रांतिकारी असल्याचेही ‘ गुगल’ कडून सांगण्यात आले आहे.
मात्र, या नव्या उपकरणामुळे काही तज्ज्ञांनीही धडकी भरवली आहे. यामुळे खासगी जीवनामध्ये हस्तक्षेप होण्याची भीती व्यक्त होत आहे, आपली माहिती रेकॉर्ड केले जाण्याचा धोकाही काही जणांनी व्यक्त केला आहे. आपल्या डोळ्यांच्या एका कोपऱ्यामध्ये स्मार्टफोनसारखे उपकरण असणे आणि त्याच्या मदतीने व्हर्चुअल विश्वाचा आनंद घेणे, खूपच आनंददायी असले तरीसुद्धा ही बाब मानसिकदृष्टीनेही धोकादायक असू शकते, असा अंदाजही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
ऑनलाइन डायरी
अनेकांना इंटरनेटवर वेगवेगळे पर्याय ट्राय करण्याची सवय असते. त्यांच्यासाठी diary.com/ ही वेबसाइट वेगळी काहीतरी ठरू शकते. याठिकाणी ऑनलाइन डायरी बनविण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
Related Keywords :
google glass
dangers of google glass
online diary