एलजीने बनवले जगातील पहिला कर्व्ह टीव्ही ; किंमत असेल 7 लाख

एलजीने बनवले जगातील पहिला कर्व्ह टीव्ही ;  किंमत असेल 7 लाखकोरियन कंपनी एलजीने 55 इंचाचा मार्व्हल कर्व्ह स्क्रीन टीव्ही बाजारात आणला आहे. या कर्व्ह ओएलइडी ( मॉडेल 22 EA 9800 ) टीव्हीला दक्षिण कोरियातून ऑर्डर मिळू लागली आहे.  या टीव्हीचे डिलिव्हरी पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे.

1400 पेक्षा जादा किरकोळ विक्रेत्यांनी ओएलईडी टीव्हीचे ऑर्डर घेण्‍यास सुरूवात केली आहे.  त्याची कोरियन चलनानुसार किंमत  15 मिलियन ( KRW ) आहे. भारतात त्याची किंमत 7 लाख 37 हजार इतकी आहे.  कर्व्ह टीव्हीचे व्यापारीकरण करणारी एलजी ही पहिली कंपनी ठरली आहे. इंटरनॅशनल कंझ्यूमर फोरमच्या समोर यावर्षी हा टीव्ही मॉडेल सादर करण्‍यात आला होता.

ADVERTISEMENT

Exit mobile version