सध्या जगभरातील सहा कोटी नागरिक बीबीएमने जोडले गेले आहेत . दररोज सुमारे १० अब्ज मेसेज या माध्यमातून पाठविले जातात . या १० अब्ज मेसेजपैकी जवळपास निम्मे मेसेज पाठविल्यानंतर २० सेकंदांच्या आत वाचले जातात . ब्लॅकबेरीच्या मेसेंजरची हीच गतिमानता त्यांची यूएसपी ठरली आहे . आता अॅपल आयओएस आणि अँड्रॉइड युजर्सनाही काही दिवसांतच याचा मोफत लाभ घेता येणार आहे .
त्यामुळे बीबीएम चॅटच्या माध्यमातून मेसेजची तत्काळ देवाणघेवाण करणे , एकाचवेळी अनेक व्यक्तींशी चॅट करणे , व्हॉइस नोट शेअरिंग यासारख्या गोष्टी सहज शक्य होणार आहेत. त्याचबरोबर ब्लॅकबेरी ग्रुप स्थापन करून बीबीएम युजर्स कॅलेंडर , फोटो , फाइल्स आणि इतर गोष्टी एकाच वेळी ३० व्यक्तींशी शेअर करू शकतील . सध्या आयओएस ६ आणि अँड्रॉइड ४ . ० (आइसक्रीम सँडविच ) किंवा त्यापेक्षा प्रगत ऑपरेटिंग सिस्टीम वापरणाऱ्यांना बीबीएमचा लाभ घेतायेणार आहे .
व्हॉट्सअॅप , निंबुझ , आयमेसेज यासारख्या मेसेजिंग सुविधा गेल्या काही वर्षांत जवळपास सर्वस्मार्टफोनवर उपलब्ध होत्या . मात्र बीबीएम केवळ ब्लॅकबेरी युजर्ससाठीच उपलब्ध असल्याने त्यावरकाही मर्यादा येत होत्या . त्यामुळे अनेक दिवसांपासून ब्लॅकबेरी अॅपल आणि अँड्रॉइड युजर्सना बीबीएमसारखी काहीतरी सुविधा उपलब्ध करून देईल , अशी चर्चा होती .
आता बीबीएमच्या माध्यमातून अँड्रॉइड आणि अॅपल युजर्ससाठी ती प्रत्यक्षात आली आहे . पण तरी विंडोज आणि सिंबियनधारकांचे काय , हे मात्र ब्लॅकबेरीने अजून जाहीर केलेले नाही . त्यामुळे या युजर्सचे काय ,या प्रश्नाचे उत्तर मात्र अनिश्चित आहे . तरी खूप मोठ्या संख्येने असलेल्या अॅपल
आणि अँड्रॉइडयुजर्सची मात्र सोय झाली आहे . बीबीएमनंतर वर्षाअखेर त्यांच्यासाठी व्हॉइस , व्हीडिओ चॅट आणि बीबीएम चॅनलची सुविधा देण्याचीही योजना ब्लॅकबेरीने बनवली आहे . आता फक्त गुगल आणि अॅपलने कुठल्याही आडकाठीशिवाय त्यांच्या अॅपस्टोअरवर हे अॅप उपलब्ध करून द्यावे , म्हणजे बीबीएमच्या चाहत्यांच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील .