फीचर्स : प्रोसेसरनिहाय दोन मॉडेल्स. 1.6 क्वाड आणि 1.2 गीगाहटर्झ क्वाड प्रोसेसर.
कॅमेरा : रिअर -13 एमपी फ्रंट – 2 एमपी थ्री-जी नेटवर्क सपोर्ट. ड्युएल कॅमेरा आणि ड्युएल व्हिडिओ कॉल सुविधा
एअर व्ह्यू : हवेत बोटे फिरवून ई-मेल, इमेज पाहता येणार
स्मार्ट पॉझ : डोळ्यांच्या हालचालीनुसार व्हिडिओ बंद-चालू होणार
किंमत : 41,500 रु.

सॅमसंगने 14 मार्च रोजी न्यूयॉर्कमध्ये गॅलेक्सी एस4 लॉंच केला होता. तर आज गुडगावच्या किंग्डम ऑफ ड्रीम्समध्ये तो भारतात लॉंच करण्यात आला. या फोनला जगभरात प्रचंड मागणी मागणी असून जवळपास 50 देशांमध्ये तो विक्रीस उपलब्ध झाला आहे. लॉंचच्या पहिल्या महिन्यातच 1 कोटी फोन्स विकल्या जाण्याची अपेक्षा आहे. तर जूनपर्यंत हा आकडा 3 कोटींपर्यंत जाऊ शकतो.
सॅमसंगने भारतासाठी एस4 चे Exynos व्हर्जन लॉंच केले आहे. हा फोन आयफोन5 तसेच एचटीसी वन या स्पर्धक फोन्सला टक्कर देणार आहे. आयफोन5 ची किंमत 45,500 रुपये आहे. तर एचटीसी वन ची किंमत 42, 900 रुपये आहे.
गॅलेक्सी एस4बाबत प्रचंड उत्सुकता आहे. ग्राहकांनी लॉंचिंगच्या आधीच प्रीबुकींग करणे सुरु केले होते. स्मार्टफोन युझर्समध्ये या फोनबद्दल असलेल्या क्रेझचा विचार करता यापूर्वीच्या गॅलेक्सी एस3 च्या विक्रीचा विक्रम हा फोन मोडेल, असा अंदाज आहे. गॅलेक्सी एस3 प्रचंड हीट ठरला होता. फक्त 2 महिन्यांमध्ये 7 लाख फोनची विक्री झाली होती. गॅलेक्सी एस4 सद्यस्थितीत जगातला सर्वोत्तम ऍण्ड्रॉइड फोन असल्याचा दावा करण्यात येत आहे. परंतु, हे येणारा काळच ठरवेल.
गॅलेक्सी एस4 दोन प्रोसेसरच्या व्हर्जनमध्ये सादर करण्यात आला आहे. मध्ये 1.9 गीगाहर्ट्झ क्वाडकोर/ 1.6 गीगाहर्ट्झ ऑक्टाकोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 600 प्रोसेसर आहे. त्यात 2 जीबी रॅम आहे. तसेच ऍण्ड्रॉइडची लेटेस्ट 4.2.2 जेलीबिन ऑपरेटींग सिस्टीम या स्मार्टफोनमध्ये आहे.
गॅलेक्सी एस4 ची स्क्रीन अतिशय खास आहे. 1920×1080 पिक्सेल रिझॉलिशनची स्क्रीन त्यात दिली आहे. या स्क्रीनवर एचडी व्हीडिओदेखील पाहणे शक्य आहे. छायाचित्रे तसेच व्हीडिओ पाहण्याचा एक वेगळाच अनुभव या फोनमध्ये मिळणार आहे.

ग्लोव्ह्ज घालूनही एस-4ची टच स्क्रीन काम करेल. या स्मार्टफोनमध्ये एस व्हाईस ड्राईव्ह दिला आहे. ड्रायव्हींग करताना कॉल आल्यास हा ड्राईव्ह ऍक्टीव्हेट होईल.एस-4मध्ये 2600 एमएएच क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. तसेच त्यात इन्फ्रारेड जेस्चर आणि तापमापक सेंसरही आहे. यामुळे वेगवेगळ्या तापमानात फोन ऍडजस्ट होईल.
स्टोरेजसाठी या फोनमध्ये 3 पर्याय दिले आहेत. 16, 32 आणि 64 जीबी मेमरीचे पर्याय आहेत. तसेच 64 जीबीपर्यंतचे मेमरी कार्डही वापरता येऊ शकते.गॅलेक्सी एस4मध्ये मोबाईल हाय डेफिनेशन लिंक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामुळे मोबाईलच्या डिस्प्लेनुसार ऑडीओ आणि व्हीडिओ कनेक्टीव्हीटी लिंक उपलब्ध करुन देते. हे तंत्रज्ञान एचटीसी बटरफ्लाय, एलजी ऑप्टीमस जी, सोनी एक्स्पेरिया झेड, सोनी एक्स्पेरिया झेडएल, सोनी एक्स्पेरिया एसपी, गॅलेक्सी एस3 आणि एस2 या फोनमध्ये वापरण्यात आले आहे.
गॅलक्सी एस-4 मध्ये ‘स्मार्ट पॉज’ फिचर दिले आहे. व्हीडिओ पाहत असताना स्क्रीनवरुन नजर हटल्यास व्हीडिओ थांबेल.
अॅपल, नोकिया, ब्लॅकबेरीला भारतीय बाजारात जबरदस्त हादरा दिल्यानंतर सॅमसंगने प्रतिस्पर्ध्यांना आणखी तगडी मात देण्याची तयारी सुरू केली आहे. गॅलक्सी एस-4 स्मार्टफोनचे उत्पादन लवकरच भारतातून केले जाणार आहे. कंपनीच्या वतीने याची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.
नोएडा येथे कंपनीचा एक प्रकल्प कार्यरत आहे. तेथे एस-4 ची निर्मिती करण्याची योजना आहे, असे सॅमसंग मोबाइल अँड डिजिटल इमेजिंगचे प्रमुख विनित तनेजा यांनी सांगितले, परंतु नेमके कोणत्या कालावधीमध्ये हा प्रकल्प सुरू होईल, हे सांगण्यास मात्र नकार दिला. सध्या गॅलक्सी एस-4 हा स्मार्टफोन दक्षिण कोरियातून आयात करून भारतीय बाजारात विकला जातो. एस-4 ला मोठी मागणी असल्याचे लक्षात घेऊन भारतात उत्पादनाची कंपनीची योजना आहे. सॅमसंगने भारतीय बाजारपेठेत अॅपल, ब्लॅकबेरी आणि नोकियाला आपल्या फीचर्समध्ये बदल घडवण्यास भाग पाडले आहे. नवीन प्रकल्प सुरू झाल्यानंतर बाजारपेठेतील प्रतिस्पर्धी कंपन्यांना चांगलाच हादरा बसणार आहे.
04 कोटी फोनचे सरासरी वार्षिक उत्पादन नोएडाच्या प्रकल्पात. त्यात एस-3 सह 12 स्मार्टफोनचा समावेश.