इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनातील अग्रणी ‘सॅमसंग’ आणि ब्राउजरच्या दुनियेतील ‘मोझिला’ यांच्यातर्फे संयुक्तपणे नवे वेब ब्राउजर सादर करण्यात येणार आहे. ‘सर्वो’ या नावाने हे वेब ब्राउजर इंजिन बाजारात दाखल होणार आहे.
‘मोझिला’चे मुख्य तांत्रिक अधिकारी ब्रेंडन आयनीड यांनी या बाबत माहिती दिली. इंटरनेटचा वापर करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला अधिक वेगवान आणि अनेकविध सेवांचा लाभ घेता यावा, या उद्देशाने ‘सॅमसंग’समवेत मिळून नव्या ब्राउजरची निर्मिती करण्यात येणार असल्याचे आयनीड यांनी स्पष्ट केले. मोझिला आणि ‘सॅमसंग’तर्फे या ब्राउजरची निर्मिती ‘रस्ट’मध्ये करण्यात येणार आहे. या ब्राउजरच्या निर्मितीसाठी ‘मोझिला’ने ‘रस्ट’ ही नवी प्रोग्रॅमिंग लँग्वेज विकसित केली आहे. सध्या ही प्रोग्रॅमिंग लँग्वेज विकासाच्या प्रक्रियेत असून, तिचे ०.६ हे व्हर्जन बुधवारी लाँच करण्यात आले.
‘गेल्या काही वर्षांमध्ये सी प्लस प्लसवर आधारित अनेक वेब ब्राउजर विकसित करण्यात आले. मात्र, सध्याच्या आधुनिक काळात नुसते ब्राउजर असून, उपयोग नाही तर त्याची क्षमता आणि वेग वाढविणेही गरजेचे बनले आहे.उच्च क्षमतेच्या, बहुपेडी ब्राउजरची गरज सातत्याने भासत असल्याने सर्वोची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला,’ असे आयनीड यांनी स्पष्ट केले. ‘सर्वो’ची निर्मिती करून ‘मोझिला’ आणि ‘सॅमसंग’चा ब्राउजिंगच्या दुनियेतील ग्राहकांना अत्यंत सुरक्षित आणि चांगली अनुभूती देण्याचा प्रयत्न आहे. या ब्राउजरवरील कामाला सुरुवात झाली असून, ते कधी बाजारात येईल या विषयी बोलण्यास नकार देण्यात आला.
‘मोझिला’ची स्मार्टफोननिर्मितीत एंट्री
केवळ ब्राउजरच नाही, तर ‘मोझिला’ आता स्मार्टफोनच्या निर्मितीतही प्रवेश करणार आहे. ‘फायरफॉक्स’ या लोकप्रिय वेब ब्राउजरची निर्मिती करणाऱ्या ‘मोझिला’ने आता फायरफॉक्स बेस्ड स्मार्टफोनची निर्मिती करण्याचे जाहीर केले आहे. नुकत्याच झालेल्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये झेटीईच्या भागीदारीत ‘मोझिला’ने ‘फायरफॉक्स’ ही ऑपरेटिंग सिस्टीम असलेले स्मार्टफोनचे प्रारूप सादर करण्यात आले होते.