मोबाइल चाळिशीत

खिशात , पर्समध्ये सहज सामाविणारा आणि हातातउठून दिसणा-या सर्वव्यापी मोबाइलने बुधवारी चाळीशीतपदार्पण केले . आज घराघरात पोहोचलेल्या या दिमाखदारउपकरणाची ३ एप्रिल १९७३ रोजी मार्टीन कूपर या ‘मोटोरोला ‘ कंपनीतील वरिष्ठ इंजिनीअरने निर्मिती केलीआणि लँडलाइनला नवा आणि अत्याधुनिक पर्याय दिला . 

गेल्या चाळीस वर्षांमध्ये मोबाइलने तंत्रज्ञान आणि दूरसंचारक्षेत्रात ‘ न भूतो न भविष्यति ‘ क्रांती घडवून आणली .जीनिव्हास्थित ‘ इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन ‘च्या अहवालानुसार आजपावेतो जगभर ६ अब्जांपेक्षा अधिकमोबाइल आहेत . आजच्या घडीला जगाची लोकसंख्या ७अब्जांवर येऊन पोचली आहे . जागतिक लोकसंख्येच्या प्रमाणात मोबाइलच्या वाढीचे प्रमाण कितीतरी अधिकआहे . 

चाळीस वर्षांपूर्वी बाजारपेठेत आलेल्या या उपरणाची अनेकांनी हुर्यो उडविली होती . मात्र , उण्यापुऱ्या चारदशकांच्या कालखंडात या उपकरणाने सर्व विरोधकांची दाणादाण उडवित नाक मुरडणाऱ्यांच्या खिशातच नव्हेतर , मनातही जागा पटकाविली . पूर्वी केवळ हौस आणि चैनीसाठीच मोबाइल मिरविण्याचा ट्रेंड होता . आतामात्र , मोबाइल ही चैन नसून गरजेची वस्तू बनली आहे . 

मोबाइलचा जन्मदाता 

मार्टीन कूपर ( वय ८५ ) यांना मोबाइलचे जन्मदाता म्हणून ओळखले जाते . १९७३मध्ये मोबाइलची संकल्पनाकूपर यांनी विकसित करून तिचे प्रारूप सादर केले असले , तरी प्रत्यक्षात तो बाजारपेठेत येण्यासाठी दहा वर्षांचाकालावधी लागला . १९८३ मध्ये आलेल्या DynaTAX 8000X या हँडसेटची किंमत होती ३५०० डॉलर .. त्यावेळी असलेली किंमत पाहता हे उपकरण जनमानसांत लोकप्रिय होईल , अशी सुतराम शक्यताही वाटत नव्हती . ‘मोबाइलची निर्मिती झाली त्यावेळी त्याचा आकार आणि वजन खूपच होते . पण आता मुठीत सामावणारेमोबाइलही बाजारात आले आहेत . ते पाहून डोळे भरून येतात ,’ अशी भावपूर्ण प्रतिक्रियाही कूपर व्यक्त करतात .१९६०मध्ये ‘ एटी अँड टी ‘ ने कार टेलिफोनची निर्मिती केली . तो पाहून आपल्याला मोबाइलची कल्पना सुचली, असेही कूपर म्हणाले . 

सध्या जगभर ६ अब्जांहून अधिक मोबाइल फोनची विक्री झालेली असली , तरी त्यात सर्वाधिक वाटा अँड्रॉइडफोनचा आहे . 

ऑपरेटिंग सिस्टीम – बाजारहिस्सा ( टक्के ) 

अँड्रॉइड – ७२ . ४ 

आयओए – १३ . ९ 

ब्लॅकबेरी – ५ . ३ 

बाडा – ३ . ० 

सिंबियन – २ . ६ 

विंडोज – २ . ४ 

अन्य – ० . ४ 

( स्रोत : गार्टनर ) 

Exit mobile version