बदलणारं तंत्रज्ञान जग : ट्रेंड्स

तंत्रज्ञानामुळे आतापर्यंत दररोजच्या आयुष्यात खूप बदल झालेत . बदलांची ही प्रक्रीया अशीच सातत्याने सुरू राहणार आहे . जगणं अधिकाधिक सोपं करण्याच्या दृष्टीने सध्या तज्ज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत . आयबीएमने नुकतेच आगामी पाच – दहा वर्षात लोकांच्या आयुष्यात आमुलाग्र बदल घडवू शकणाऱ्या काही संशोधनांची यादी जाहीर केली आहेत . सध्या सुरू असलेले संशोधन , नवनवीन तंत्रज्ञान आणि समाजातील ट्रेंड्सवरुन ही यादी तयार करण्यात आली आहे . 


दृष्टी 
सध्या गुगलचे गॉगल्स अॅप फोटोतील गोष्टी ओळखून त्यांची माहिती देते . पण येत्या दशकाअखेर कम्प्युटर केवळ छायाचित्रांवरून ओळख पटवणार नाही तर मानवाप्रमाणे पिक्सेलनुसार समोरची गोष्ट ओळखू शकेल .उदाहरणार्थ भविष्यात लाल सिग्नल पाहून थांबायचे आहे , हे कम्प्युटरला कळेल . किंवा एखाद्या व्यक्तीला कोणते कपडे योग्य दिसतात , हे सांगू शकेल . वस्त्रोद्योगात सध्या अधिकाधिक ऑनलाइन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या तंत्राचा उपयोग सुरू आहे . हे तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रासाठी खूप फायदेशीर ठरेल . त्यामुळे निरोगीपेशी आणि दूषित पेशींमधील फरकही ओळखता येऊ शकेल . 

स्पर्श 
गेल्या कित्येक दशकांपासून यंत्रांना स्पर्श आणि संवेदनांची जाणीव व्हावी यासाठी तज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत .त्यांना लवकरच यश मिळेल अशी चिन्हे आहेत . 
टचस्क्रीन मोबाइल , टॅबलेट ही त्याचीच सुरुवात आहे . सध्या इन्फ्रारेड , प्रेशर सेन्सिटिव्ह तंत्रज्ञानाचा वापर करून स्पर्श ओळखणे यासारख्या गोष्टींवर संशोधन सुरू आहे . त्यामुळे भविष्यात कम्प्युटरला कापडाला स्पर्शकरुन त्याचा प्रकार किंवा त्वचेला स्पर्श करून निदान करता येईल . 

गंध 
एखादा वास घेऊन तो फुलाचा आहे की कृत्रिम हे ओळखणे लवकरच कम्प्युटरला शक्य होणार आहे . त्यामुळे स्क्रीनवर पाहून चमचमीत खाद्यपदार्थाचा गंध सामावून घेणे शक्य होईल . एखाद्या व्यक्तीच्या शरीरातून येणारा गंध , श्वासातील विविध घटक आणि शारीरिक हालचालींवर यंत्राच्या सहाय्याने डॉक्टर दमा , डायबिटीस ,फिट्स येणे , किडनीतील बिघाड वगैरे आजारांचे निदान करू शकतील . सध्या डिजीसेंट आणि ट्रायसेनएक्स या कंपन्या कम्प्युटरच्या मदतीने गंध तयार करणारे उपकरण तयार करत आहेत . डिजीसेंटने केमिकल स्ट्रक्चरच्या आधारे हजारो गंध एकत्र केले असून सेंट स्पेक्ट्रमच्या आधारे त्याच्या डिजिटायझेशनचे काम सुरू आहे . जेणेकरून कम्प्युटर गंध ओळखू शकेल . आयबीएमही सेन्सर्सच्या आधारे परिसरातील केमिकल्स गोळा करण्याचे तंत्र विकसित करत आहे . त्यावरून साफसफाई झाली आहे का , प्रदूषण किती आहे याचा अंदाज येऊ शकेल . सध्या पर्यावरणातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी किंवा दुर्मिळ कलाकृती जतन करण्यासाठी आयबीएम यातंत्राचा वापर करत आहे . 

चव 
विविध पदार्थातील मूळ घटकांच्या मॉलेक्युल्सची चाचणी करून , मानवी मनाला आवडणारी चव आणि गंधयांचा संयोग साधून चव ओळखण्याचे तंत्र तयार करत आहे . लक्षावधी रेसिपींची तुलना करुन आयबीएम हे तंत्र विकसित करते आहे . जपानमध्येही त्सुकुबा विद्यापीठात खाद्यपदार्थाची चव आणि त्यानंतर तोंडात तयार होणा -या विविध क्रियांचे विश्लेषण करण्यासाठी फूड सिम्युलेटर विकसित करण्यात गुंतले आहे . विविध केमिकल्स एकमेकांबरोबर कशी वागतात , त्यातील बाँडिंग स्ट्रक्चर यांच्या अल्गोरिदमचे विश्लेषण करुन चव ओळखण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत . 

ध्वनी 
कम्प्युटरने ध्वनीचे विश्लेषण सुरू केल्यानंतर आवाज , त्यामागील प्रेशर , ध्वनी तरंग ओळखणे सोपे होणार आहे .त्यामुळे परिसरात घडणा – या बारीकसारिक बदलांवरुन भविष्यातील हालचालींचे अंदाज वर्तवता येतील .उदाहरणार्थ , वा – याच्या आवाजात झालेला बदल यावरुन वादळ , भूकंप यांचा अंदाज वर्तवता येईल . 

Exit mobile version