आयडियाने सादर केला स्वस्त ‘ऑरोस-2 ‘ स्मार्टफोन मोबाइल

आयडिया या मोबाइल कंपनीने स्वस्त किंमतीचा पहिला अ‍ॅंड्रॉइड  स्मार्टफोन ‘ऑरोस – 2’  बाजारात सादर केला आहे. मोबाइल बाजारपेठेतील हा स्मार्टफोन सर्वात कमी किंमतीचा आहे. या स्मार्टफोनमध्‍ये महागड्या फोनमध्‍ये असलेली सर्व फीचर्स आहेत. तो अ‍ॅंड्रॉईडवर आधारित थ्री जी स्मार्टफोन आहे. किंमत कमी असल्याने मोबाइल बाजारपेठेत आहे.

ऑरोस-2 मध्‍ये डबल सिमची सुविधा आहे. 1 गिगाहर्टझ प्रोसेरबरोबर 512 रिम आण‍ि फ्रंटला कॅमेरा आहे
3.5 इंचीचा टचस्क्रीन , रिझोल्युशन 320 * 480, 3.2 मेगापिक्‍सल कॅमेरा आणि व्हिडिओ कॉलिंग  ही  फीचर्स या  स्मार्टफोनमध्‍ये देण्‍यात आली आहे.
या स्मार्टफोनची किंम‍त 6,490 रूपये असेल. आयडिया सेल्युलरच्या  दाव्यानुसार गेल्यावर्षी 3 लाख  3 -जी स्मार्टफोन मोबाइल विकण्‍यात आली..

ADVERTISEMENT
Exit mobile version