
हवावेच्या अॅक्सेंड पी-2 मोबाइलमध्ये 4.7 इंच स्क्रीन आणि 13 मेगा पिक्सल कॅमेरा आहे. हा जगातील सर्वात वेगवान स्मार्टफोन असल्याचा कंपनीचा दावा असून या स्मार्टफोनवर एलईटी 4 चिपच्या साह्याने 4जी नेटवर्कवर 150 मेगाबाइट प्रतिसेकंद दराने डाऊनलोड करता येऊ शकते. हवावे ही चिनी कंपनी असून या फोनमध्ये स्मार्ट टच फिचर आहे. मात्र या फोनचे स्क्रीन रेज्यूलेशन एलजी, नोकिया आणि एचटीसी फोनच्या तुलनेत कमी असून हा फोन पूर्ण एचडी व्हिडिओ दिसत नाही. मोबाइल वर्ल्ड काँग्रेस हे जगातील सर्वात मोठे मोबाइल प्रदर्शन मानले जात आहे. या प्रदर्शनात कंपन्या नावीण्यपूर्ण तंत्रज्ञान जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करतात.
अधिक स्मार्ट होत आहेत स्मार्टफोन
* बदलत्या काळानुसार स्मार्टफोन अधिकाधिक स्मार्ट होत चालले आहेत. सध्याच्या स्मार्टफोनमध्ये क्वॉड कोअर प्रोसेसर आहे आणि त्यात 13 मेगापिक्सलपर्यंत कॅमेरा आहे. एवढेच नाही तर सर्वच स्मार्टफोन दिसायलाही जवळपास सारखेच आहेत. म्हणजे काचेची मोठी स्क्रीन आणि वरतून एकही बटण नाही. त्यामुळे प्रत्येक स्मार्टफोनचे वैशिष्ट्य आणि फरक जोर देऊन सांगावा लागतो.
*सध्याच्या स्मार्टफोनमध्ये निअरफील्ड कम्युनिकेशन नावाचे नवीन वैशिष्ट्यपूर्ण फीचर आले आहे. या तंत्रज्ञानाच्या साह्याने तुम्ही तुमचा मोबाइल वापरून कोणत्याही क्रीडा स्पर्धेत जाऊ शकता. त्यासाठी तुम्हाला छापील तिकिटे खरेदी करण्याची गरज नाही. तुमचा मोबाइलच तिकिटाचे काम करेल आणि तिकिटाचे पैसेही मोबाइलद्वारेच कापून घेतले जातील. गेल्या अनेक महिन्यांपासून या तंत्रज्ञानाची चर्चा सुरू आहे. आता हे तंत्रज्ञान लोक किती प्रमाणात वापरतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
अॅपल आयओएस की गुगल अँड्रॉइड?
मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये लाँच होत असलेल्या मोबाइलमध्ये मोबाइल ऑपरेटिंग सिस्टिमच्या बाजारात तिसरे स्थान पटकावण्यासाठी काट्याची स्पर्धा सुरू आहे. मोबाइल बाजारात अँड्रॉइड आणि आयओएस ऑपरेटिंग सिस्टिमचा सर्वाधिक वाटा आहे. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बाकीच्यांना प्रचंड संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे मागील वर्षी बाजारातील वाटा गमवाव्या लागलेल्या नोकिया आणि ब्लॅकबेरीला स्पर्धेत टिकण्यासाठी झगडावे लागत आहे.