‘यू ट्यूब’ला आव्हान व्हेवो

web.jpg‘ यू ट्यू ‘ ब हे नाव कुणाला माहीत नाही ? पण उठल्यासुटल्या त्यावर आपण जे व्हिडिओ पाहतो , ते नक्की कोण अपलोड करतं , एखादी ठराविक कंपनी ‘ यू-ट्यूब ‘ ला डेटा पुरवते का , याचा आपण कधीही विचार करत नाही आणि केला , तरी आपण त्याचे उत्तर शोधतोच , असं नाही. प्रत्यक्षात ‘ गुगल ‘ च्या ‘ यू-ट्यूब ‘ ला डेटा पुरवणारी व्हेवो नामक कंपनी आहे. तिला ‘ गुगल ‘ कडून मोठा आर्थिक फायदा होतो. एका क्लिकसरशी आपल्याला दिसणारा व्हिडिओ हा बहुदा व्हेवोनेच यू-ट्यूबला पुरवलेला असतो. मात्र आता ही व्हेवो कंपनी स्वत:च व्हिडिओ ब्रॉडकास्ट करण्याच्या विचारात असल्याने यू ट्यूबला नवं आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. 


आतापर्यंत यू ट्यूबला डेटा पुरवणारी एक महत्त्वाची कंपनी म्हणून ‘ व्हेवो ‘ लोकप्रिय होती ; पण ‘ गुगल ‘ सारख्या मातब्बर खेळाडूपुढे ती झाकोळून गेली. पण स्वत:चा ब्रॅण्ड सिद्ध करणे , तो विकसित करणे हे उद्दीष्ट कंपनीने आपल्यासमोर ठेवले आहे. या क्षेत्रात जबरदस्त स्पर्धेत असलेल्या ‘ गुगल ‘ आणि ‘ अॅपल ‘ या कंपन्यादेखील नजीकच्या काळात ‘ व्हिडिओ ब्रॉडकास्टिंग ‘ क्षेत्रात उतरणार आहेत. या स्पर्धेत टिकून राहावे म्हणून कदाचित ‘व्हेवो ‘ ने स्वतःचा ब्रँड विकसित करण्याचे ठरवले असावे. ‘ व्हेवो ‘ चे सीइओ रिओ कारेफ यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली. 


‘ व्हेवो टीव्ही ‘ मुळे स्मार्टफोनवर असंख्या व्हिडिओ गाणी सलग पाहता येणार आहेत. यू ट्यूबवर सामान्यतः आपल्याला जे गाणे ऐकायचे असेल , तेवढेच सिलेक्ट करता येते. वेगवेगळे व्हिडिओ सलग पाहता येत नाहीत. ही उणीव ‘ व्हेवो ‘ ने भरून काढली आहे. या वर्षी ही सेवा कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. 


या क्षेत्रातील स्पर्धेविषयी सीईओ कारेफ यांनी एक महत्त्वाचे विधान केले. गुगल आणि अॅपल यांचे नाव न घेता त्यांनी ‘ व्हेवो ‘ चा इरादा स्पष्ट केला. ‘ प्रत्येक कंपनीचे एक वैशिष्ट्य असते. ग्राहकांच्या गरजा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या असतात. एक ठराविक कंपनी सर्व ठिकाणी लोकप्रिय नसते. सर्वांनाच या क्षेत्रामध्ये स्पर्धेला वाव आहे,’ त्यांनी सांगितले. मात्र , असे सांगतानाच यू-ट्यूब बरोबर ‘ व्हेवो ‘ चा असलेला करार मात्र चालू ठेवण्याचा त्यांचा मानस आहे. काहीही असो , आपल्यासारख्या टेक्नो-सॅव्हींना कंपन्यांच्या स्पर्धेविषयी फारसे आकर्षण नसते.’ व्हेवो ‘ लाँच करत असलेला टीव्हीमुळे यूझरना किती फायदा होत आहे , स्मार्टफोनवर व्हिडिओ बघताना यूझरला त्रास तर होणार नाही ना , हे महत्त्वाचं आहे. यू ट्यूब सारख्याच आणखीही काही सेवा या वर्षी आपल्याला बघायला मिळतील , अशी आशा बाळगायला मात्र काही हरकत नाही. 

Exit mobile version